शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

Satara: ड्रग्ज प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह आणखी नऊ अटकेत, कऱ्हाडच्या पोलिसांची मुंबईत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:43 IST

संशयितांकडून पोलिसांनी आणखी २० ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले

कऱ्हाड : ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांसह आणखी नऊजणांना अटक केली आहे. कऱ्हाडच्या संयुक्त पोलिस पथकाने मुंबईत ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या नऊ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या संशयितांकडून पोलिसांनी आणखी २० ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले आहे.अमित अशोक घरत (वय ३१, रा. करांजडे, ता. पनवेल, जि. रायगड), दीपक सुभाष सूर्यवंशी (४३, रा. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. तुर्भे, मुंबई), बेंजामिन ॲना कोरू (४४, रा. कोपरखैरणे नवी मुंबई), रोहित प्रफुल्ल शहा (३१, रा. शनिवार पेठ, माळी कॉलनी, कऱ्हाड), सागना इ मॅन्युअल (३९, रा. घणसोली, नवी मुंबई), नयन दिलीप मागाडे (२८, रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद सुनील देवरुखकर (३०, रा. पावस्कर गल्ली, कऱ्हाड), संतोष अशोक दोडमणी (२२, रा. सैदापूर, ता. कऱ्हाड), फैज दिलावर मोमीन (२६, रा. मार्केट यार्ड, कऱ्हाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अटकेत असलेल्या एकूण संशयितांची संख्या आता बारा झाली आहे.संशयितांकडून आतापर्यंत सुमारे ३० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी राहुल अरुण बडे (वय ३७, र. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कऱ्हाड), समीर ऊर्फ सॅम जावेद शेख (२४, रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कऱ्हाड), तौसिब चाँदसो बारगीर (२७, रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका, कऱ्हाड या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तीन पथकांनी केला तपासएमडी ड्रग्ज प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी तीन पथके तयार केली. त्यामध्ये उपअधीक्षक कार्यालयाचे पथक, कऱ्हाड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि उंब्रज पोलिस ठाण्याचे पथक होते. त्यापैकी मुंबईला गेलेल्या पथकांनी दोन परदेशी नागरिकांसह पाचजणांना मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले, तर दुसऱ्या दोन पथकांनी आणखी चारजणांना ताब्यात घेऊन अटक केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस