नऊ उमेदवारांचे अर्ज मागे

By Admin | Updated: October 1, 2014 01:11 IST2014-10-01T01:08:09+5:302014-10-01T01:11:10+5:30

आज अंतिम दिवस : तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार

Nine candidates withdraw their application | नऊ उमेदवारांचे अर्ज मागे

नऊ उमेदवारांचे अर्ज मागे

सातारा : विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी आज, मंगळवारी एकूण नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. उद्या, बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत किती उमेदवार उभे राहणार, हे उद्या दुपारी तीन वाजल्यानंतरच समजणार असून, यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातून आठ मतदारसंघांतून १७१ उमेदवारांनी २६० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी झालेल्या छाननीदरम्यान ३२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे १६० उमेदवारांचे २२८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. आज छाननीचा पहिला दिवस होता.
फलटण विधानसभा मतदारसंघातून राजेशकुमार यादवराव तासगावकर, वाई मतदारसंघातून प्रदीप रामदास माने, माण मतदारसंघातून सोनिया जयकुमार गोरे, ‘कऱ्हाड उत्तर’मधून अशोक पांडुरंग पाटील, ‘कऱ्हाड दक्षिण’मधून सुरेश जयवंत भोसले, पाटण मतदारसंघातून सुभाष तानाजीराव देसाई, शंभूराज प्रकाश देसाई, शिवाजी गोविंद नांगरे, तर सातारा विधानसभा मतदार संघातून वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले.
दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Nine candidates withdraw their application