शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

मद्यपान करत हवेत गोळीबार करणाऱ्या नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 10:34 IST

Crimenews Satara :  खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यपान पार्टीचे आयोजन करीत दारु पिऊन हवेत रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती व सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमद्यपान करत हवेत गोळीबार करणाऱ्या नऊ जणांना अटकगुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस करीत आहेत अधिक तपास

शिरवळ/सातारा  :  खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यपान पार्टीचे आयोजन करीत दारु पिऊन हवेत रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती व सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.   याघटनेप्रकरणी किरण देविदास निगडे (वय 46 रा.गुळूंचे ता.पुरंदर जि.पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय 28, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा),नवनाथ बबन गाडे (वय 34, रा.चोपडज,पोस्ट करंजे, ता.बारामती जि.पुणे), माधव अरविंद जगताप (वय 32,रा.वाकी पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे), तात्याराम अर्जून बनसोडे (वय 38,रा.अंथूर्णे ता.इंदापूर जि.पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय 39,रा.चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे),योगेश प्रकाश रणवरे (वय 42, रा.राख ता.पुरंदर जि.पुणे),वसंत नामदेव पवार (वय 47,रा.कोळविहीरे ता.पुरंदर जि.पुणे),अरविंद घनशाम बोदेले (वय 41,सध्या रा.लवथळेश्वर ,जेजूरी ता.पुरंदर जि.पुणे मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

यामध्ये किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली रिव्हाँल्व्हर,दोन कार,मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रिव्हाँल्व्हरद्वारे हवेत गोळीबार करीत बेकायदेशीररित्या मिञ योगेश रणवरे याला रिव्हाँल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार करीत वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत पोलीसी खाक्या दाखविला. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ,भारतीय शस्ञ अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस