शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेची आत्महत्या; सासूचा आत्महत्येचा प्रयत्न, साताऱ्यातील विंग येथील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 17:40 IST

सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याचा नातेवाइकांचा पवित्रा

कऱ्हाड : राहत्या घरातील स्वयंपाकगृहात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर सुनेच्या आत्महत्येनंतर सासूने हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे, तर सासू राणी अंकुश माने (वय ३४) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथील नीलम हिचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत माने याच्याशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम ही स्वयंपाकगृहात झोपली होती, तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना पाहून सासू राणी माने हिने दोन्ही हाताच्या नसा कापून घेत आमहत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच घटना समजल्यानंतर मृत नीलमचे माहेरचे नातेवाईक कऱ्हाडात दाखल झाले. त्यांनी कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात येत होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी