शाहीर पवारांच्या साहित्यातून नवी दृष्टी

By Admin | Updated: January 29, 2015 00:15 IST2015-01-28T21:03:46+5:302015-01-29T00:15:19+5:30

सुभाष एरम : ‘अंधारातील दिवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

A New Vision from Shahir Pawar's Literature | शाहीर पवारांच्या साहित्यातून नवी दृष्टी

शाहीर पवारांच्या साहित्यातून नवी दृष्टी

कऱ्हाड : ‘शाहीर आबाजी पवार यांनी अपंगत्वावर मात करून आपल्या साहित्यातून समाजाला नवी दृष्टी दिली,’ असे उद्गार कऱ्हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी काढले.सासपडे, ता. कऱ्हाड येथील अपंग शाहीर आबाजी पवार यांनी लिहिलेल्या ‘अंधारातील दिवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कऱ्हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.दिलीप गुरव म्हणाले, ‘शाहीर आबाजी पवार यांनी आपल्या अपंगात्वाचे भांडवल न करता अपंगाला जिद्दीने जगण्याचा संदेश आपल्या कवितांमधून दिला आहे. त्यांच्या कवितांमध्ये जीवन जगण्याची उमेद दिसून येते.’यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाष जोशी, बँकेचे संचालक अशोक शिंदे, डॉ. अनिल लाहोटी, अ‍ॅड. संभाजी मोहिते, सीताराम शिंदे, शरद मंत्री तसेच मोहन माळी व जयश्री गुरव तसेच अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई संस्थेचे संचालक आर. पी. शर्मा, अरविंद सुरवाडे, बी. आर. शिंदे, संजय खंडागळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शाहीर आबाजी पवार, सी. डी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: A New Vision from Shahir Pawar's Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.