शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By दीपक शिंदे | Updated: November 1, 2022 19:22 IST

ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही

सातारा/बामणोली : कोयनेच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मी वाढलोय. पहिल्यापासून गावाची ओढ आहे. कुठे काय उगवते आणि लावलेले रोपटं कसं वाढवायचं, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे राज्यात जे नवीन रोपटे लावले आहे, ते अत्यंत उत्तम प्रकारे जोपासले जाईल आणि त्याची वाढही होईल. त्यामुळे ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही, असा टोला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे खुर्द या गावी आले होते. त्यांनी मंगळवारचा पूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे यांना शेतीबाबत प्रचंड आवड आहे. दरवर्षी भात लावणीसाठी पावसाळ्यात आणि काढणीसाठी दिवाळीच्या काळात ते येत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पावसाळ्यात त्यांना फारसा वेळ देता आला नाही. मात्र, आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत त्यांनी मंगळवारचा संपूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्याबरोबरच फळबागेतही फेरफटका मारत झाडांची पाहणी केली. त्यांनी स्वत: आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. पुढील तीन महिन्यांमध्ये या स्ट्रॉबेरीला फळे येणार आहेत. तर पावसाळ्याच्या दरम्यान लावलेल्या स्ट्रॉबेरीला सध्या लाल चिटूक स्ट्रॉबेरीही लागलेली दिसली.ते म्हणाले, आपण जेव्हा शेती करतो तेव्हाच इतरांना सांगू शकतो. त्यामुळे या भागात मी विविध प्रकारची शेती केली आहे. शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. शेतात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. स्ट्रॉबेरी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट अशी वेगवेगळी फळशेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. पर्यायी पिके घेतली तर अडचणी कमी येतील. राज्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी त्यातून सावरून कसे नियोजन करावे, यासाठी हे प्रयोग शेतात केले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांची पारंपरिक शेती खूप कमी होती. काही वर्षांत त्यांनी याठिकाणी शेती विकत घेतली आहे. त्या शेतात त्यांनी गोशाळाही बांधली आहे. यामध्ये गावठी गायींचे पालन केले जाते. त्याबरोबरच शेतीसाठी पाण्याकरिता शेततळे बांधण्यात आले असून, या शेततळ्यात मत्स्यपालनही केले जाते. अशा प्रकारे त्यांनी एकाच ठिकाणी विविध प्रयोग करून राज्यातील शेतकऱ्यांसाठीही वेगळा संदेश दिला आहे.या शेतीत मी खूप रमतो...गावाबद्दल प्रचंड ओढ आहेच; पण या ठिकाणचा निसर्ग एकनाथ शिंदे यांना नेहमी खुणावत असतो. या ठिकाणचा हिरवागार परिसर मनाला आनंद देतो. समोर निळेशार पाणी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि या परिसरात मोबाइलचा संपर्क होत नाही. त्यामुळे सर्व कोलाहलापासून दूर निवांत राहता येत असल्याने याठिकाणी अधिक रमतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे