खंडाळा : सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एका वळणावर दुचाकी कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विशेष म्हणजे, डोक्याला हेल्मेट घातले असूनही कठड्याचा मार कपाळावरच लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगरूटवाडी-खंडाळा गावाच्या हद्दीत खंबाटकी बोगदा ओलांडून धोम-बलकवडीच्या कालव्यावरील पुलावरून पुढे आल्यावर वळणाचा अंदाज न आल्याने एक लाल रंगाची मोटारसायकल (एमएच ०३ बीएफ ४५३६) खाली पडली. दुचाकीस्वार अतुल पुरुषोत्तम आशर (वय ४५, रा. घाटकोपर, मुंबई) याचे कपाळ घाटाच्या कठड्यावर जोरात आदळले. आशर यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. तरीही कपाळावरच मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. मोहन शंकर भुसारी यांनी खंडाळा पोलिसांत घटनेची खबर दिली.
खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर तीव्र उतार असून, वळणेही अशास्त्रीय आहेत. त्याचा अंदाज न आल्याने जुन्या टोलनाक्यापर्यंतचा रस्ता ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात अशास्त्रीय वळणांमुळे झाले असून, शुक्रवारी आणखी एक बळी गेला.
अपघातानंतर तात्पुरती मान डोलावणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शहाणपण कधी येणार, असा सवाल परिसरातील स्थानिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
हेल्मेट घालूनही कपाळमोक्ष!
By admin | Updated: December 5, 2014 23:30 IST
दुचाकीस्वार ठार : खंबाटकीच्या अशास्त्रीय वळणांचा बळी
हेल्मेट घालूनही कपाळमोक्ष!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}