शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गुन्हेगारी कारवायामुळे साताऱ्यातील नीरा नदीपात्र बदनाम; आत्महत्या, खूनाच्या घटनेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 14:24 IST

परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कारागृहात परजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या परस्परांशी झालेल्या ओळखीचं पर्यवसान पुढे टोळीत होत असल्याने पोलिस यंत्रणासाठी यांना जेरबंद करणे मोठे आव्हान ठरत आहे. परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.सातारा जिल्ह्यात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद यासह पुण्या-मुंबईच्या टोळ्या सक्रिय असतात. या टोळ्यांच्या मध्ये नव्या चेहऱ्यांचा उपयोग कारवायांसाठी केला जातो. गुन्हा पचविण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा नदीचे पात्र सुरक्षित असल्याची रेकी गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांनी केली आहे. परिणामी गेल्या वर्षभरामध्ये वीसहून अधिक घटना शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. वास्तुविशारद यांचा खून, सांगलीतील उद्योजकांच्या मुलाचा घातपात व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचा समावेश आहे.

पुण्यापेक्षा सातारा सोयीचासातारा जिल्ह्याच्या हद्दीत खून करून निरा नदीपात्रात मृतदेह टाकल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका संशयिताने पोलीस तपासात धक्कादायक खुलासा केला होता. त्याने पोलिसांजवळ सांगितलं की, ‘पुण्यात गुन्हा दाखल झाला तर कोणाकडे जायचं आणि कुठं कोणाला मॅनेज करायचं, हा मोठा प्रश्न असतो. तिथं होणाऱ्या ‘तडजोडी’ हलक्यात नसतात. पुण्यापेक्षा सातारा कधीही ‘परवडतो’! आता हे परवडणं काय आणि कसं यावर मात्र तो संशयितच अधिक प्रकाश टाकू शकतो.

कारागृहात मिळतेय यंत्रणांना गुंगारा देण्याची शिकवणकारागृहात आठवड्यापेक्षा अधिक वेळ राहिलेल्यांना येथे गुन्हेगार विश्वातील गुरू आणि महागुरू भेटतात.आपापल्या आवडीने कारागृहात टोळीत सहभागी व्हायचं आणि बाहेर पडल्यानंतर काही काम असेल तरच भेटायचं हा निकष अगदी ठरलेला असतो. कारागृहात असताना मात्र, गुन्हा कसा करावा? पुरावा कसा नष्ट करावा? यासह यंत्रणेला गुंगारा देण्याचे एकसेएक किस्से चवीने सांगितले जातात

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीriverनदी