शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद; अपघातग्रस्त लेकीसाठी वडील पोहोचले अमेरिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:19 IST

सातारा : अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता ...

सातारा : अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता विभागात अत्यवस्थ असलेल्या लेकीला हाक मारल्यानंतर डोळ्यांची किंचित हालचाल झाल्याने वडिलांच्या येण्याने नीलम उपचारांना प्रतिसाद देईल, असा विश्वास तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणारी अपघातग्रस्त नीलम शिंदे अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. तिच्या रक्तातील नातेवाइकांना व्हिसा मिळविण्यात येणाऱ्या अडचणींचे विघ्न सुटून तिचे वडील तानाजी शिंदे आणि मामाचा मुलगा गाैरव कदम चोवीस तासांच्या प्रवासानंतर यूसी डेव्हिस मेडिकल सेंटर सॅकरामेन्टो येथे पोहोचले. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे नीलमवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमबरोबर वडिलांचा संवाद झाला नाही. मात्र, तिची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडिलांची हाक ऐकल्यावर डोळे बंद असतानाही तिच्या बुबुळांची हालचाल टिपली.

कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.तिचे वडील व मामाचा मुलगा सॅकरामेन्टोला निघाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री ते पोहोचले. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेअकरानंतर नीलमवर उपचार करणारे डाॅक्टर तिच्या कुटुंबीयांशी बोलून उपचारांची पुढील दिशा ठरविणार आहेत.

 भारतीयांची मदत अन् डाॅक्टरांची प्रतीक्षाउंब्रज येथील नीलम शिंदे हिला भेटण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना मदत करण्यासाठी अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथील भारतीयांनी आघाडी घेतली. विमानतळावरून हाॅस्पिटलमध्ये नेण्यासाठी भारतीय पोहोचले होते. दहा दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था सॅन जोसे स्टेट युनिव्हर्सिटीने केली आहे. तिने या दोघांना काेणतीही अडचण येणार नाही याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAmericaअमेरिकाAccidentअपघातStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल