स्त्रियांचे साहित्य वैश्विक बनण्याची गरज

By Admin | Updated: May 11, 2015 23:47 IST2015-05-11T23:47:30+5:302015-05-11T23:47:43+5:30

सुधा कांकरिया : रामापुरात भरला महिला साहित्यिकांचा मेळा; कविसंमेलनाला दाद

The need for women to become global | स्त्रियांचे साहित्य वैश्विक बनण्याची गरज

स्त्रियांचे साहित्य वैश्विक बनण्याची गरज

विटा : एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला जाणले पाहिजे. एवढेच नव्हे, तर तिने स्वत:लाही जाणले पाहिजे. जी तुम्हाला जन्म देते, तिची अवहेलना करण्यापेक्षा तिचा सन्मान करायला शिकले पाहिजे. स्त्रियांनी जाणिवेने लिहिले पाहिजे व स्त्रियांचे साहित्य वैश्विक झाले पाहिजे, असे विचार ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या प्रणेत्या व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केले. रामापूर (ता. कडेगाव) येथे अक्षरयात्री प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून डॉ. कांकरिया बोलत होत्या. यावेळी डॉ. उर्मिला चाकूरकर, प्रिया धारूरकर, प्रा. अनुराधा गुरव, डॉ. सौ. स्वाती शिंदे-पवार, महिला शाहीर अनिता खरात, प्रा. डॉ. सुनंदा शेळके, माजी आ. सदाशिवराव पाटील, डॉ. मानाजी कदम यांच्यासह राज्यभरातील महिला साहित्यिक उपस्थित होत्या.
डॉ. कांकरिया यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कवयित्री डॉ. सौ. स्वाती शिंदे-पवार यांच्या ‘मास्तरकी अंधारात मठ्ठ काळा बैल’ व प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील यांच्या ‘कोरं पान’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. कांकरिया म्हणाल्या, पुस्तकांतून प्रकट होणारे अमृतविचार परिवर्तनाकडे घेऊन जात असतात. मात्र आजही समाजात स्त्रिया असुरक्षित आहेत. स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.
यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. उर्मिला चाकूरकर यांनी, महिलांनी दुसऱ्यांचे साहित्य वाचल्याशिवाय आपल्या साहित्यात प्रगल्भता येणार नाही, असे मत व्यक्त केले. जाणिवांतून साहित्याची निर्मिती होत असते, अक्षरवाङ्मय चळवळ जिवंत राहण्यासाठी साहित्य संमेलने आवश्यक असल्याचे प्रिया धारूरकर यांनी सांगितले.
साहित्य संमेलनापूर्वी रामापूर गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रा. अनुराधा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी कवयित्री ज्योती कदम, दीपाली घाडगे, डॉ. अनिता खेबूडकर, प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील, सौ. स्वाती शिंदे-पवार, सुनंदा शेळके, अस्मिता इनामदार, शिल्पा कुलकर्णी, नीलम माणगावे, डॉ. भारती पाटील, डॉ. मंजुश्री पाटील, चैत्राली जोगळेकर, वासंती मेरू यांच्यासह राज्यातील निमंत्रित ५१ महिला कवयित्रींनी कविता सादर केल्या.
डॉ. नीलम माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. या संमेलनास कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर आदींसह राज्यातील महिला साहित्यिकांनी हजेरी लावली होती.
यावेळी अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, धमेंद्र पवार, जयवंत आवटे, श्रीकांत माने, समीक्षा शितोळे उपस्थित होते. स्वाती शिंदे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)

विटा : एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला जाणले पाहिजे. एवढेच नव्हे, तर तिने स्वत:लाही जाणले पाहिजे. जी तुम्हाला जन्म देते, तिची अवहेलना करण्यापेक्षा तिचा सन्मान करायला शिकले पाहिजे. स्त्रियांनी जाणिवेने लिहिले पाहिजे व स्त्रियांचे साहित्य वैश्विक झाले पाहिजे, असे विचार ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या प्रणेत्या व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केले.
रामापूर (ता. कडेगाव) येथे अक्षरयात्री प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून डॉ. कांकरिया बोलत होत्या. यावेळी डॉ. उर्मिला चाकूरकर, प्रिया धारूरकर, प्रा. अनुराधा गुरव, डॉ. सौ. स्वाती शिंदे-पवार, महिला शाहीर अनिता खरात, प्रा. डॉ. सुनंदा शेळके, माजी आ. सदाशिवराव पाटील, डॉ. मानाजी कदम यांच्यासह राज्यभरातील महिला साहित्यिक उपस्थित होत्या.
डॉ. कांकरिया यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कवयित्री डॉ. सौ. स्वाती शिंदे-पवार यांच्या ‘मास्तरकी अंधारात मठ्ठ काळा बैल’ व प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील यांच्या ‘कोरं पान’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. कांकरिया म्हणाल्या, पुस्तकांतून प्रकट होणारे अमृतविचार परिवर्तनाकडे घेऊन जात असतात. मात्र आजही समाजात स्त्रिया असुरक्षित आहेत. स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.
यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. उर्मिला चाकूरकर यांनी, महिलांनी दुसऱ्यांचे साहित्य वाचल्याशिवाय आपल्या साहित्यात प्रगल्भता येणार नाही, असे मत व्यक्त केले. जाणिवांतून साहित्याची निर्मिती होत असते, अक्षरवाङ्मय चळवळ जिवंत राहण्यासाठी साहित्य संमेलने आवश्यक असल्याचे प्रिया धारूरकर यांनी सांगितले.
साहित्य संमेलनापूर्वी रामापूर गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रा. अनुराधा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी कवयित्री ज्योती कदम, दीपाली घाडगे, डॉ. अनिता खेबूडकर, प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील, सौ. स्वाती शिंदे-पवार, सुनंदा शेळके, अस्मिता इनामदार, शिल्पा कुलकर्णी, नीलम माणगावे, डॉ. भारती पाटील, डॉ. मंजुश्री पाटील, चैत्राली जोगळेकर, वासंती मेरू यांच्यासह राज्यातील निमंत्रित ५१ महिला कवयित्रींनी कविता सादर केल्या.
डॉ. नीलम माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. या संमेलनास कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर आदींसह राज्यातील महिला साहित्यिकांनी हजेरी लावली होती.
यावेळी अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, धमेंद्र पवार, जयवंत आवटे, श्रीकांत माने, समीक्षा शितोळे उपस्थित होते. स्वाती शिंदे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
या संमेलनात महिला शाहीर अनिता खरात यांनी सादर केलेला शाहिरीचा कार्यक्रम रात्री साडेबारापर्यंत रसिकांनी श्रवण केला. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच स्त्रीशक्तीचा जागर मांडणारे पोवाडे यावेळी सादर केले. या कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महिला साहित्यिकांची ग्रंथदिंडी
ग्रंथदिंडीत ग्रामस्थ व महिलांनी मोठी हजेरी लावली होती. डॉ. सुधा कांकरिया, उर्मिला चाकूरकर, प्रिया धारूरकर, डॉ. अनुराधा गुरव, सुनंदा शेळके, स्वाती शिंदे-पवार यांच्यासह राज्यभरातील महिला साहित्यिकांनी डोक्याला फेटा बांधून ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. तुतारी, पख्वाज, टाळ-मृदंगाचा गजर अशा अस्सल मराठमोळ्या वाद्यांनी रामापूर परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामस्थांनाही यानिमित्ताने एक साहित्याने भारलेले वातावरण अनुभवता आले.

Web Title: The need for women to become global

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.