वृक्ष संर्वधनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:00+5:302021-03-28T04:37:00+5:30
कोरोनाचे संकट सातारा : ग्रामीण भागात यात्रा-जत्रांच्या हंगामात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर यंदा कोरोनामुळे संकट ओढावले असून, लाखोंची उलाढाल ठप्प ...

वृक्ष संर्वधनाची गरज
कोरोनाचे संकट
सातारा : ग्रामीण भागात यात्रा-जत्रांच्या हंगामात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर यंदा कोरोनामुळे संकट ओढावले असून, लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील पुसेगाव, कऱ्हाड, आनेवाडी, लोणंद, पाचवड, सायगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरवले जातात.
स्वच्छता मोहीम
महाबळेश्वर : महाबळेश्वरमधील प्रसिद्ध केटस पॉईंट येथे सह्याद्री ट्रेकर्स, ब्राईट लँड रिसॉर्ट व हिलदारी यांच्या संयुक्त विद्माने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे यांनी मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
पशुपक्ष्यांचा वावर
सातारा : शहर व परिसरातील काही तलावांचे पाणी स्त्रोत आटू लागल्याने त्या परिसरात शेवाळ वाढू लागले आहे. या शेवाळामुळे अन्नाचा शोध घेत पशुपक्षी तलावांवर गर्दी करू लागले आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अनेक पाणी स्त्रोतांना डबक्याचे स्वरूप आले आहे.
पाचगणीत कारवाई
पाचगणी : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने पाचगणीत नगरपालिका व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, मास्क नसणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. पाचगणी हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने दोन्ही यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.