राष्ट्रवादीच्या फलटण तालुक्यात भाजपने लावला जोर

By Admin | Updated: January 15, 2015 23:24 IST2015-01-15T19:57:23+5:302015-01-15T23:24:28+5:30

भरत पाटील : दादासाहेब चोरमले, सुशांत निंबाळकर यांच्यावर जबाबदारी

NCP's Phaltan taluka has thrown emphasis on BJP | राष्ट्रवादीच्या फलटण तालुक्यात भाजपने लावला जोर

राष्ट्रवादीच्या फलटण तालुक्यात भाजपने लावला जोर

फलटण : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या फलटण तालुक्यात भाजपने सभासद नोंदणीचा जोर लावला आहे. सदस्य नोंदणी अभियान फलटण शहर व तालुक्यात प्रभावीरितीने राबवून त्या माध्यमातून वाढत्या जनसंपर्काद्वारे भाजपाचा विचार प्रत्येक गाव वाडीवस्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी फलटण शहराध्यक्ष दादासाहेब चोरमले व तालुकाध्यक्ष सुशांत निंंबाळकर यांच्यावर विशेष जबाबदारी दिली. असल्याचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपा संपर्क कार्यालय व तक्रार निवारण केंद्राच्या उद्घाटन समारंभानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांशी बोलताना जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकविचाराने फलटण शहर व तालुक्यात सभासद नोंदणी अभियान राबवून प्रत्येक कुटुंबापर्यंत भाजपाचा विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आगामी काळात सर्वांगीण प्रगतीसाठी सुरु असलेल्या कामकाजाची, ध्येय धोरणांची माहिती पोहोचवावी असे आवाहन यावेळी भरत पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य व देशात भाजपाची वाटचाल सक्षमपणे सुरु आहे. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात भाजपा सदस्य नोंदणी अभियान चालविले जाणार असून येथील नवनिर्वाचित पदाधिकारी ते काम योग्य रितीने करतील यात काही शंका नाही तथापी त्यांना पदाधिकारी, कार्र्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्षांनी केले. दादासोा चोरमले व सुशांत निंबाळकर यांच्या निवडीबद्दल सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भरत पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अनुप सुर्यवशी, बाळासाहेब खाडे, उत्तमराव भोसले, फलटण शहर सरचिटणीस माणिक शहा, अनिल शेळके, प्रसाद करवा, अ‍ॅड.रणजित नाईक निंंबाळकर, संजय चिटणीस, रविंद्र फडतरे, दामुआण्णा रणसिंग यांच्यासह मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

तालुक्यातील अडीअडचणी सोडविणार
आपल्याला दिलेल्या संधीच्या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यातील जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी दादासोा चोरमले व सुशांत निंबाळकर यांनी सांगितले. तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहून भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार नवनिर्वाचितांनी केला. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

Web Title: NCP's Phaltan taluka has thrown emphasis on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.