शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला १४४ जागा हव्याच!

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

निर्धार मेळावा : अजित पवार, सुनील तटकरे यांची काँग्रेसवर खरपूस टीका

सातारा : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या त्सुनामी लाटेत आम्ही महाराष्ट्रात मित्रपक्ष काँग्रेसपेक्षा वरचढ ठरलो असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा येथे निर्धार मेळाव्यात ठणकावून सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आम्ही १४४ जागांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले.सातारा येथे आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला. मेळाव्यात तटकरे आणि पवार यांच्याबरोबरच जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही काँग्रेसवर खरपूस टीका केली.लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण करतच तटकरे यांनी विधानसभेला कार्यकर्त्यांनी सतर्क राहून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘गुजरात विकासाचे मॉडेल चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेची दिशाभूल केली. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला, मात्र गेल्या दोन महिन्यांतील त्यांच्या कामाचा आढावा लक्षात घेता ‘अच्छे दिन’ कुठे गेले, याचा शोध घ्यावा लागतो.’निर्धार मेळाव्यात प्रमुख मान्यवरांनी काँग्रेसकडून खच्चीकरण होत असल्याची तक्रार केली. त्याचा संदर्भ देत तटकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा एक नंबरचा शत्रू असल्याचे जर काँग्रेसचे नेते म्हणत असतील, तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल. सातारा जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्यांची पिळवणूक होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला स्वबळावर राष्ट्रवादीचे सरकार आणावयाचे आहे. त्या अनुषंगाने आपण साऱ्यांनी मिळून सत्ता स्थापनेच्या निर्धाराने पावले टाकूया. आपल्याला सोशल मीडियावर भर द्यावा लागणार असून, त्याची सुरुवात साताऱ्यातून करूया, असे आवाहनही तटकरेंनी केले. (प्रतिनिधी)आम्ही व्यवहाराने जागा मागतोयआगामी विधानसभेसाठी आम्ही १४४ जागांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार करतच अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले, ‘लोकसभेला आमच्या चार जागा असल्या तरी तुमच्यापेक्षा दुप्पट आहेत. आम्ही व्यवहाराने जागा मागतोय, आमच्याही कार्यकर्त्यांनी आता किती दिवस फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचे. त्यांनाही आमदार म्हणून मिरवू द्या.’‘कऱ्हाड दक्षिण’चा विषय काँग्रेसचा‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी अजून आमच्यात जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल, हा निर्णय आमचा आहे. ‘कऱ्हाड दक्षिण’ची जागा काँग्रेसची आहे. तेथे काँग्रेसचा उमेदवार कोण असावा, हा त्यांचा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलणे टाळले.