शहरं
Join us  
Trending Stories
1
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
2
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
3
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
4
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
5
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
6
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
7
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
8
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
9
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
10
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
11
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
12
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
13
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
14
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
15
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
16
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
17
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
18
अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क
19
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मलकापुरात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला राष्ट्रवादी देणार साथ; पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:30 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धवसेना एकत्र; नेत्यांच्या बैठकांमध्ये निर्णय

माणिक डोंगरेमलकापूर : मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अखेर तीन पक्षांची महाआघाडी एकत्र आली. राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धवसेनेचं दोन मागेपुढे सरकण्याचे ठरलं असून, आपापल्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं असल्याची खात्रीदायक माहिती आहे. त्यामुळे बहुतांशी प्रभागात दुरंगी लढत होणार, हे निश्चित झाले आहे.मलकापुरात भाजपमध्ये काँग्रेसमधील बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर मलकापुरात भाजपला एकहाती सहज सत्ता मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया जशी जशी पुढे येत गेली, तसतसे हळूहळू पर्याय निघत गेल्याची परिस्थिती निर्माण झाली. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने बारा ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उद्धवसेनेच्या वतीने दोन प्रभागात उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसच्या वतीने तीन प्रभागात उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यापासून दोन दिवसांत बैठकांवर बैठका झाल्या. आजअखेर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रीय काँग्रेस व उद्धवसेना यांच्यात मेळ बसला. भाजपला रोखण्यासाठी मलकापुरात एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही चिन्हांची एकत्रित प्रचार यंत्रणा तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे मलकापुरात उर्वरित १७ प्रभागांपैकी बहुतांशी प्रभागात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांची मात्र एकला चलो ची भूमिका सध्या दिसत आहे.नगराध्यक्ष पदासाठी महाआघाडीच्यावतीने एकच उमेदवार !

मलकापुरात राज्यातील महायुतीत असलेल्या घटक पक्ष राष्ट्रवादी आणि महाआघाडीतील दोन घटक पक्ष काँग्रेस व उद्धवसेना एकत्र येऊन वेगळीच महाआघाडी उदयास आली आहे. या महाआघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदालाही एकच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मलकापुरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Maha Aghadi joins hands to stop BJP in Malkapur.

Web Summary : Nationalist Congress Party (NCP), Congress, and Uddhav Sena unite in Malkapur to challenge BJP in municipal elections. They will contest on their respective party symbols, aiming for a two-way fight in most wards. A single Maha Aghadi candidate will contest for the position of Mayor.