शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Panchgani Municipal Council Election Results 2025: पाचगणीचा नगराध्यक्ष अवघ्या दोन मतांनी विजयी, राष्ट्रवादीने पुन्हा काबीज केली सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:04 IST

Panchgani Nagar Palika Election Results 2025: मंत्री मकरंद पाटील यांनी लक्ष्मी कऱ्हाडकर यांना दिला धक्का

पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागून राष्ट्रवादीने लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या सत्तेला थांबवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पाचगणीत पुन्हा सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बगाडे यांनी कऱ्हाडकर यांचे उमेदवार संतोष कांबळे यांचा केवळ दोन मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे पाचगणी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता स्थापित झाली आहे.सत्तेची गोळाबेरीज सध्या चालू असून राष्ट्रवादीला १२ तर लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे ८ नगरसेवक असे बलाबल आहे. नगराध्यक्ष दिलीप बगाडे हे राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी लक्ष्मी कऱ्हाडकर यांना सत्तेबाहेर ठेवण्यात यश संपादन केले आहे.

वाचा : साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री

गेले १५ वर्षाचा राष्ट्रवादीचा राजकीय वनवास संपुष्टात आला आहे. यावेळी पोलिस बंदोबस्तासाठी दोन अधिकारी, २७ पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा कर्मचारी ६, होमगार्ड ५० असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दोन जोडपे पालिकेतया निवडणुकीत प्रकाश गोळे आणि अमृता गोळे तसेच वैभव कऱ्हाडकर आणि अभिलाषा कऱ्हाडकर या दोन श्री आणि सौ आता पालिकेत प्रवेश करणार आहेत.

आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे मार्गदर्शन आणि साथीने आपण यशस्वी ठरलो असून यापुढे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन आम्ही पाचगणीच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आता स्वच्छ सुंदर पाचगणी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी सांगितले. - दिलीप बगाडे, विजयी नगराध्यक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Pachgani Local Election: NCP Wins, Bagade Elected President by Two Votes

Web Summary : In Pachgani, NCP regained power as Dilip Bagade won the mayoral election by two votes, defeating Karhadkar's candidate. NCP secured 12 councilors, ending their 15-year political exile. Two couples are also entering the council.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Satara areaसातारा परिसरMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५NCPराष्ट्रवादी काँग्रेसMakarand Patilमकरंद पाटील