शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:10 IST

सातारा मार्गावर जवळवाडी गावानजीक दुचाकी खड्ड्यात आदळून मागील सीटवर बसलेली भाग्यश्री गणेश जाधव (वय २३, रा. मोरावळे, ता. जावळी) ही नवविवाहिता रस्त्यावर पडली, दरम्यान, याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने तिला धडक दिल्याने यात तिचा जागीच मृत्यू झाला. केवळ एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या भाग्यश्रीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठारखड्ड्यामुळे आणखी किती बळी जाणार ?

मेढा : सातारा मार्गावर जवळवाडी गावानजीक दुचाकी खड्ड्यात आदळून मागील सीटवर बसलेली भाग्यश्री गणेश जाधव (वय २३, रा. मोरावळे, ता. जावळी) ही नवविवाहिता रस्त्यावर पडली, दरम्यान, याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने तिला धडक दिल्याने यात तिचा जागीच मृत्यू झाला. केवळ एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या भाग्यश्रीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.याबाबत अधिक माहिती अशी, रिटकवली गावचे माजी सरपंच सर्जेराव मर्ढेकर यांची मुलगी भाग्यश्री हिचा विवाह ३१ मे २०१९ रोजी मोरावळे येथील गणेश जाधव यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर आषाढ (आखाड ) पाळण्यासाठी भाग्यश्री ही माहेरी चार दिवसांपूर्वी रिटकवली येथे आली होती.

सोमवारी मेढ्याचा बाजार असल्याने सर्जेराव मर्ढेकर हे आपली मुलगी भाग्यश्री हिला घेऊन दुचाकीवरून मेढा येथे गेले होते. किराणा बाजार खरेदी केल्यानंतर दोघेजण रिटकवलीकडे दुचाकीवरून येत होते. मेढा- सातारा मार्गावर जवळवाडी गावाच्या स्वागत कमानी नजीक हे दोघे आले असता रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी जोरदार आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेली भाग्यश्री गाडीवरून खाली पडली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ( एमएच ४२ बी ८५०८) तिला धडक दिली. तिच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. भाग्यश्रीचे वडील सर्जेराव मर्ढेकर हे सुद्धा जखमी झाले.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कासम उस्मान मुलाणी( रा. बुध,ता खटाव) याला वेण्णानगर येथून ताब्यात घेतले. भाग्यश्रीचा विवाह होऊन अवघा एक महिनाच झाला होता. सासरी पाठवणी करत नांदा सौख्यभरे असा आशीर्वाद देणाऱ्या पित्यावरच तिला अखेरचा निरोप देण्याची दुर्देवी वेळ आली. रिटकवली या गावी भाग्यश्रीचा मृतदेह नेताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.खड्ड्यामुळे आणखी किती बळी जाणार ?मेढा- सातारा रस्त्यासह तालुक्यात रस्त्याची झालेली चाळण व रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यामुळे आणखी किती बळी पडणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. आणखी बळी जाण्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजवावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर