शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'कॉलर स्टाइल'ची खिल्ली उडवणाऱ्या पवारांबद्दल उदयनराजे म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 12:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कॉलरबाजीवर उदयनराजे दिली 'ही' प्रतिक्रिया

कराड : ‘कॉलर उडविणे ही तर माझी स्टाईल आहे, शरद पवार यांच्यासारख्या एका आदरणीय व्यक्तिमत्त्वानं त्याचं अनुकरण केलं यातच मला आनंद आहे. असे सांगत सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मीच असणार,' असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी (13 मे) पत्रकारांशी बोलताना केले. कराड येथे खासदार उदयनराजे भोसले एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विजयसिंह यादव, हणमंत पवार यांचीदेखील उपस्थिती होती.

‘काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये तुमच्यावर कॉलरबाबत टिप्पणी केली होती,’ असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता उदयनराजे म्हणाले, ‘ते राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. आज या वयातही त्यांच्याकडे काम करण्याचा असणारा उत्साह आपल्याला लाजवणारा आहे. त्यांच्या अनेक बाबींचं मी अनुकरण करत असतो; पण परवा त्यांनी साता-यात माझ्या स्टाईलचं अनुकरण केलं, याचा मला आनंद वाटतो.’

('मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा)

तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठ फिरविली होती. मग आता राजधानी महोत्सवाचे त्यांना निमंत्रण दिले आहे का? असे विचारताच ते म्हणाले, ‘होय मी याही कार्यक्रमाचे सा-यांना निमंत्रण दिले आहे. यायचं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. शिवाय मला ते बोलवत नाहीत. नाही तर म्हणतील त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकतो.’

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्लॅन बी तयार केल्याची चर्चा आहे, असे विचारता राष्ट्रवादी काँगे्रसचा लोकसभेचा उमेदवार मीच असणार, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी समोर येऊन बोलावे तुमच्या विरोधात आज टीकाटिप्पणी होत आहे. याबाबत विचारले असता ‘ज्यांना बोलायचे आहे त्यांनी समोर येऊन बोलावे, असे आव्हान खासदार उदयनराजे यांनी दिले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार