शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:49 IST

माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच

ठळक मुद्दे मामा विधानसभेसाठी इच्छुक

नितीन काळेल।सातारा : माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली; पण मामांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे तिढा कायम असून, अशा घटनांमुळे रोज घडतंय बिघडतंय असे चित्र आहे.

मागील दोन निवडणुकीपेक्षा यंदाची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगतदार बनू शकते, असेच वातावरण आहे. कारण, आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून, सतत नवनव्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव मागे पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हेच माढ्यातून उतरू पाहत होते; पण मतदारांचा वाढता विरोध पाहता त्यांनीही माढ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे आताही राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह यांचे नाव उमदेवार म्हणून पुढे आले; पण ठोस असे काहीच होत नाही. त्यातच प्रभाकर देशमुख यांनाही लॉटरी लागेल, असे सांगण्यात येते; पण मोहिते-पाटील हे देशमुखांचे काम करणार का? हाही प्रश्न आहे. तसेच मोहिते-पाटील पितापुत्रापैकी कोणा एकाला उमेदवारी मिळाली तर माळशिरस तालुक्यातील त्यांचे विरोधक जोरदार विरोध करणार, हे ठरलेले आहेच. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हेही मोहिते-पाटील यांना सहकार्य करण्याची आशाही नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीला उमेदवार देताना व निवडून आणताना यावेळी खूपच दमछाक करावी लागणार आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत अनेकांना मानवणारा असा उमेदवार देणेच राष्ट्रवादीला परवडणार आहे.

दुसरीकडे भाजपचे बरेचसे गणित हे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते, त्यावर अवलंबून आहे.मोहिते-पाटील विरोधात संजयमामा ?माढ्यात सध्या राजकीय चित्र सतत बदलत असून, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संजयमामांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्याची तयारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मोहिते-पाटील आणि संजयमामा हे कोणत्याही पक्षातून लढले तरी लढत ही रंगतदारच ठरणार, हे निश्चित; पण हे चित्र दिसणार का ? यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांपुढे तिढा...मुख्यमंत्री आणि संजयमामा यांची मंगळवारी रात्री भेट झाल्याचे वृत्त आहे. यावेळी मामांना माढ्यातून उभे राहण्याची गळ घातली. त्यावेळी तुम्हाला उमेदवारी द्यायची असेल तर आमच्या मित्रांपैकी कोणी अपक्ष उभा राहिला तर पाठिंबा द्या, असे मामांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण