शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं

By दीपक देशमुख | Updated: March 8, 2023 16:08 IST

महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा सोहळा पार पडला

सातारा : सामूहिक विवाह सोहळ्याबाबत ऐकले होते; पण सामूहिक बारसे पहिल्यांदाच ऐकले. सातारा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या सामूहिक बारशाचा आजचा उपक्रम राज्याला नक्कीच दिशा देणारा आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रथम होत असेल, असे गौरवोद्गार भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काढले.सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सुनिशा शहा, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विकास भोसले, विठ्ठल बलशेटवार आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या, महिला एक दिवस संपावर गेल्यातर काय होईल, याची कुणी कल्पना करू शकत नाही. महिलांना देवत्व देऊ नका; पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र नक्की द्या. आजची महिला कुठेच कमी नाही. तिला आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. आगामी काळात महिला आर्थिक स्वावलंबी कशी होईल, यासाठी महिला माेर्चा काम करेल. महिला जोपर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत तिचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा महिलांतील कर्तृत्वाला वाव देणार आहे.लहान मुलांचे बारसे करताना एक ते दोन वर्षांच्या नामकरण न झालेल्या मुलींचेही बारसे झाले. ५१ मुलींचे बारशाचे नियोजन होते; पण ७० हून अधिक मुलींची बारशी झाली. या उपक्रमामुळे मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गगार वाघ यांनी काढले.यानंतर वाघ यांनी स्वत: काही मुलींचे नामकरण केले. यावेळी नवजात मुलींना भेटवस्तू, पालकांना पोशाख करण्यात आले. हळदी-कुंकू व वाणवाटप सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.नैराश्यातून विरोधकांची वक्तव्येकार्यक्रमानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजघराण्याचा भाजपत सन्मान नसल्याचे विरोधकांचे आरोप असल्याचे पत्रकारांशी सांगितले असता वाघ म्हणाल्या, हातातोंडाशी असलेला घास गेल्यामुळे विरोधक नैराश्यवस्थेत आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलत आहेत. त्यांची वक्तव्ये गांभिर्याने घेण्याची गरज नाही. तसेच महिलांच्या सुरक्षितेला सरकार प्राधान्य देत आहे. शक्ती कायदा झाला तर त्याचे स्वागत आहे. तरीही सध्याचे कायदे सक्षम असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. गेल्या सात महिन्यात महिला अत्याचारप्रकरणी कसूर केलेल्या दोन डझन पोलिसांना निलंबीत केले आहे. बारा वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार झाल्यास फाशीची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहेच; पण समाजाने अशा विकृती हटवण्यासाठी सहभाग घेण्याची व जनजागृतीची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomen's Day Specialजागतिक महिला दिनBJPभाजपा