शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

खंडाळ्यातील माहिती नाशिकमधील शेतकºयांच्या नावावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:46 IST

शिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी ...

ठळक मुद्देकर्जमाफी योजनेबद्दल नाराजी आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा 

शिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी जाहीर केल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यापासून अनेक प्रकारची बंधने घातलेले परिपत्रक जाहीर केल्यानंतर शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामध्येच शासनाने योजनेचे खरे लाभार्थी मिळावेत, यासाठी शेतकºयांची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून आॅनलाईन भरण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण भागात ज्याठिकाणी इंटरनेटच्या सुविधा आहे. त्याठिकाणी शेतकºयांनी धाव घेत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागले. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या योजनेला सोसायटीसह बँकांनी हरताळ फासत आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून हात झटकल्याने तसेच शासनाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था गावांमधून अर्ज भरण्यासाठी निर्माण न केल्याने शेतकºयांवर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यामध्येच गेल्या दोन दिवसांपासून खंडाळा तालुक्यातील इंटरनेट सेवेसह शासनाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरणाºया महा ई सेवा केंद्र, सेतू, सायबर कॅफे यामध्ये शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बसावे लागत आहे. त्यामध्येच शासनाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकºयांना बसत आहे. 

संबंधित कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरताना कर्जमाफी संदर्भातील माहिती भरल्यानंतर प्रिंट मारताना खंडाळा तालुक्यातील बबन सीताराम ढमाळ या शेतकºयाची माहिती ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चापडगाव या गावातील दत्तू चौधरी या शेतकºयाच्या नावावर निघाली. त्यामुळे शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकारच्या संदर्भातील अशी अनेक प्रकरणे खंडाळा तालुक्यातील अर्ज भरणाºया केंद्रावर निर्माण झाल्याने संबंधितांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्याची मोहीम स्थगित केली आहे. 

यामुळे खंडाळा तालुक्यातील कानाकोपºयातून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसत रिकाम्या हाताने परत घराकडे परतावे लागले. यामुळे  कर्जमाफी योजनेच्या संदर्भात शेतकºयांवर नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ आणली आहे.‘पीकविमा‘च्या वेबसाईटचाही गोंधळ...

 शासनाने पीकविमा भरण्यासाठी अनेक निकष लावत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबिवली. मात्र, हे करीत असताना शासनाच्या पीकविम्याच्या वेबसाईटचे तीन तेरा वाजत आहेत. वेबसाईट सतत डाऊन राहिल्याने व शासनाने दिलेली मुदतही संपल्याने खंडाळा तालुक्यातील अनेक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.