शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

महसुली गावाचं नाव पडलं ‘म्हासोली’!

By admin | Updated: March 29, 2015 00:42 IST

१६०० चा कालखंड : उंडाळे विभागातील ५२ गावांचा महसूल एकाच गावाच्या चावडीत

लिंगनूर : त्राटिकेचे सोंग काढणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव म्हणून परिचित असणाऱ्या बेडग (ता. मिरज) येथे मरगाई देवीची यात्रा तीन दिवस उत्साहात पार पडली. विविध कार्यक्रमांसाठी चार दिवसांत सुमारे लाखभर भाविकांनी उपस्थिती लावली. बेडगच्या मरगाईदेवीच्या यात्रेस दरवर्षी गुढीपाडव्याच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी प्रारंभ होतो. पाडव्यापासून गावातील पिठाची गिरणी व कांडप यंत्रे यात्रा होईपर्यंत बंद करण्याची पद्धत आहे. यंदा यात्रेस गुरुवार, दि. २६ मार्चपासून प्रारंभ झाला. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. पहिल्यादिवशी दंडवत, दुसऱ्यादिवशी अंबील शिंपणे, तर तिसऱ्यादिवशी पालखी उत्सव असा कार्यक्रम असतो. पहिल्यादिवशी धनगरी ओव्या व त्यानंतर सलग दोन दिवस कलापथकांचे मनोरंजनात्मक कार्यक्रमही पार पडले. रविवारीही लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. मुख्य दिवशी त्राटिकेचे सोंग काढण्यात येते. त्याला रामायणातील आख्यायिकेचा संदर्भ आहे. महाराष्ट्रात बेडग या एकमेव गावात त्राटिकेचे सोंग काढण्यात येते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता या सोंगांना प्रारंभ झाला. रात्री बारापर्यंत सोंगांना पाहण्यास भाविक व स्थानिकांनी गर्दी केली होती. परराज्यात गेलेल्या मूळ निवासी बेडगकरांसोबतच माहेरवाशीण महिला न चुकता यात्रेसाठी येतात. यात्रेनिमित्त विविध दुकाने, मिठाई, खेळणी, शीतपेये, विविध आकारातील पाळणे यांची रेलचेल होती. यात्रेदरम्यान ग्रामपंचायत व यात्रा समितीने मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. (वार्ताहर) सोंगांची वैशिष्ट्ये सुमारे सहा फू ट उंच लाकडी पट्टीवर सोंगांना उभे करण्यात येते. त्राटिकेचे सोंग काढणारी व्यक्ती काठीच्या आधाराने चालते. अतिशय कौशल्याने केवळ दोन उभ्या लाकडी पट्ट्यांवर चालावे लागते. यंदा सोंगांची उंची सुमारे १५ फूट होती. पूर्वी त्राटिकेचे सोंग १७ फुटापर्यंत उंच असे, पण विद्युत तारांचे अडथळे लक्षात घेऊन उंची कमी करण्यात आली आहे. त्राटिकेचे सोंग घेणाऱ्याला पारंपरिक पद्धतीने सजवले जाते. सजावटीचे साहित्यच सुमारे ५५ किलोचे असते. त्यात मुखवटा, साडी, मोरपिसे, दागिने यांचा समावेश असतो. त्राटिकेच्या सोंगासोबतच सेनापती, प्रधानजी, काळेसूर, बलिचर, सरस्वतीचे दोन घोडेस्वार या पात्रांचाही समावेश असतो.