‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदी रणजितसिंहांचे नाव निश्चित

By Admin | Updated: June 23, 2014 00:51 IST2014-06-23T00:27:58+5:302014-06-23T00:51:56+5:30

फलटणमध्ये आनंदोत्सव : प्रतीक्षा नियुक्तीपत्राची

The name of Ranjeet Singh as the Vice President of Krishna Valley | ‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदी रणजितसिंहांचे नाव निश्चित

‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदी रणजितसिंहांचे नाव निश्चित

फलटण : येथील स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख व काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निश्चित झाले आहे. ‘लोकमत’ने यापूर्वी वर्तविलेला अंदाज यामुळे खरा ठरला आहे. दरम्यान, रणजितसिंह यांना आता अधिकृत पत्राची प्रतीक्षा आहे.
रणजितसिंह व त्यांचे वडील प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. याबाबतचे वृत्त फलटणमध्ये समजताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. हिंदुराव यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी पेढेही वाटून आनंदोत्सव साजरा केला होता. (प्रतिनिधी)
नाईक-निंबाळकरांची हॅट््ट्रिक
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद फलटण तालुक्याला तिसऱ्यांदा मिळत आहे. १९९५ मध्ये तत्कालीन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, १९९८ मध्ये तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी हे पद भूषविले आहे. हिंदुराव यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह यांची वर्णी लागत आहे.

Web Title: The name of Ranjeet Singh as the Vice President of Krishna Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.