शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव नगरपंचायतीत शहर विकास परिवर्तन पॅनेलला एकहाती सत्ता, अनेक दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:42 IST

​​​​​​​राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ४ जागांंवर समाधान मानावे लागले आहे. कमी जागा लढवत असलेल्या कॉंग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे.

कोरेगाव : संपूर्ण सातारा जिल्ह्यात व्होल्टेज निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ४ जागांंवर समाधान मानावे लागले आहे. कमी जागा लढवत असलेल्या कॉंग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. आमदार महेश शिंदे यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकीत शहरात अक्षरश: तळ ठोकला होता. त्यांनी शहराचा प्रत्येक प्रभाग पिंजून काढले होते.नगरपंचायत निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला १३ प्रभागांसाठी तर १८ जानेवारीला ४ प्रभागांसाठी अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. १९ हजार ९०९ मतदारांपैकी १४ हजार ९२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्याचे प्रमाण हे ७४.५८ टक्के एवढे आहे.डी. पी. भोसले महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील-नाईकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या उपस्थितीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी ९ टेबलवर दोन फेर्यांमध्ये करण्यात आली. सर्वप्रथम १ ते ९ प्रभागांचा तर दुसर्या फेरीत १० ते १७ प्रभागांचा निकाल जाहीर करण्यात आला.कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १- स्नेहल अर्जुन आवटे (३१८), प्रभाग क्र. २ - साईप्रसाद सुरेश बर्गे (५६४), प्रभाग क्र. ३- वनमाला प्रदीप बर्गे (५२५), प्रभाग क्र. ४- दीपाली महेश बर्गे (६४४), प्रभाग क्र. ५- सागर दत्ताजीराव बर्गे (६७६), प्रभाग क्र. ६- सागर नारायण वीरकर (५२७), प्रभाग क्र. ७- राहूल रघुनाथ बर्गे (६१६), प्रभाग क्र. ८- अर्चना किरण बर्गे (४३९), प्रभाग क्र. १२- राजेंद्र कोंडिबा वैराट (५४८), प्रभाग क्र. १३- संगीता नितीन ओसवाल (३२२), प्रभाग क्र. १४- परशुराम चंद्रकांत बर्गे (४४९), प्रभाग क्र. १५- शीतल संतोष बर्गे (५८३) व प्रभाग क्र. १६- सुनील बाळासाहेब बर्गे (७०८).राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. ९- संजीवनी सचिन बर्गे (६२४), प्रभाग क्र. १०- हेमंत आनंदराव बर्गे (३५०), प्रभाग क्र. ११- प्रभावती आनंदराव बर्गे (४७६), प्रभाग क्र. १७- मोनिका गणेश धनवडे (३७९).सुनील बाळासाहेब बर्गे यांनी सर्वाधिक ७०८ मते घेतली आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलेले बर्गे हे पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून नगरपंचायतीत प्रवेश करणार आहेत. सध्या त्यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका होत्या. दीपाली महेश बर्गे यांनी देखील लक्षवेधी ६४४ मते मिळाली आहेत. १४२ जणांनी नोटाचे बटण दाबले. प्रभाग क्र. १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली विजय वीरकर यांना नोटा या प्रकाराबरोबरच पाठिंबा दिलेल्या, मात्र मतपत्रिकेवर नाव असलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या १९ मतांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कॉंग्रेस पक्षाला देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे.कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या विजयामध्ये आमदार महेश शिंदे यांच्यासह डॉ. प्रिया महेश शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांचा वाटा आहे. प्रचंड संघटन कौशल्याच्या आधारे या पॅनेलने नगरपंचायतीत परिवर्तन घडवून आणले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवानांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२koregaon-acकोरेगाव