उरमोडीचा दगड लावण्यापासून पाणी येईपर्यंत माझाच पुढाकार

By Admin | Updated: April 9, 2016 00:02 IST2016-04-08T23:12:56+5:302016-04-09T00:02:57+5:30

उदयनराजेंचे पत्रक : कारखान्यासाठी सिंचन योजना राबविणारे नाठाळच!

My initiation has been to start from the coconut | उरमोडीचा दगड लावण्यापासून पाणी येईपर्यंत माझाच पुढाकार

उरमोडीचा दगड लावण्यापासून पाणी येईपर्यंत माझाच पुढाकार

 सातारा : ‘काही नाठाळांना शेतकरी हितापेक्षा स्वहिताचीच काळजी असते, म्हणूनच ते आपल्या कुठल्यातरी कारखान्यासाठी सिंचन योजना राबवितात आणि आपला स्वार्थी हेतू साध्य झाल्यावर अशा योजना परवडत नाहीत म्हणून अपूर्ण ठेवण्याची काळजी घेतात. या पार्श्वभूमीवर उरमोडी धरणाचा दगड लावण्यापासून सातत्याने प्रयत्न केले,’ अशी भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. उरमोडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सुमारे १० किलोमीटर झालेल्या कामातील पाटाद्वारे पाणी सोडण्याच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, उरमोडी धरणाच्या बाबतीतही धरसोडवृत्ती त्यावेळी जागृत होती. धरणाची एक वेळा नव्हे, तर तब्बल तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु काम मात्र काडीचेही सुरू केले गेले नव्हते. मी त्यावेळी समाजकारणाबरोबरच राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. म्हणूनच तीनवेळा भूमिपूजन आणि गाजावाजा करून केलेली कामे सुरू का होत नाहीत, याचेच मला दु:खद आश्चर्य वाटत आहे. नंतर युती शासन आले, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहिले, धरणाकरिता मोठा निधी कृष्णा खोऱ्याचे कर्जरोखे काढून उभारण्यात आला. त्यावेळी आधी धरण आणि मग पुनर्वसन अशी मानसिकता तत्कालीन राज्यकर्त्यांची होती, त्यावर माझी पुनर्वसन आणि धरण दोन्ही एकाच वेळी ही मात्रा लागू पडली. एका रात्रीत ६ कोटी ९६ लाखांचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून वाटप ही केला, अनेक बैठका घेऊन दुष्काळी जनतेला पाणी देण्याचे महत्त्वाचे कार्य तुमच्या त्यागामुळे होणार आहे, असे वारंवार पटवून देऊन धरणाच्या कामाचा श्रीगणेशा त्यावेळी करण्यात आला. पुनर्वसन निधी त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात तातडीने मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला, असा निर्णय यापूर्वी घेतला गेला नव्हता. पुढील तीन-चार वर्षांत जवळजवळ ८० टक्केधरण बांधून पूर्ण झाले आणि तत्कालीन युतीची सत्ता गेली व पुढे १० वर्षांत पुन्हा एक फूटभर सुद्धा बांधकाम झाले नाही.
नंतर २००९ मध्ये मी संसदेत लोकांचे प्रतिनिधीत्व करू लागलो, आणि पुन्हा २०१०-११ नंतर उरमोडीच्या उर्वरित कामाला ही सुरुवात झाली. धरण झाले, कालव्याची काही कामे झाली, माण-खटावच्या काही भागांत पाणी गेले; परंतु माझी त्यागी जनता धरण उशाशी असूनही उपाशीच होती. पुन्हा कंबर कसली, कालव्यांची कामे का होत नाही, याचा जाब विचारला आणि उरमोडी उजव्या कालव्याचे कालांतराने १० किलोमीटरचे काम पूर्ण होऊन आज अंबवडे बुद्रुक, भोंदवडे, अंबवडे खुर्द, डबेवाडी, जकातवाडी, शहापूर, सोनगाव या सातारा तालुक्यातील ७ गावांतील १९५० एकर क्षेत्राकरिता पाणी मिळण्याची सोय झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले. (प्रतिनिधी)

अजून ७ हजार एकर बाकी...
७ गावांना तरी उरमोडीचे आज पाणी मिळत आहे, अजूनही ७००० एकराला पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. माण, खटाव व सातारा तालुक्यांत मिळून २७,७५० क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे. उरमोडी धरणासाठी अनेकांचे योगदान आहेच; परंतु सर्वांत जास्त योगदान येथील १४ गावांतील विस्थापितांचे आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

Web Title: My initiation has been to start from the coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.