अनैतिक संबंधाच्या रागातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:04 IST2021-05-05T05:04:47+5:302021-05-05T05:04:47+5:30

ढेबेवाडीः पाटण तालुक्यातील मत्रेवाडी येथे शिवारात सापडलेल्या युवकाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ...

Murder of a youth out of anger over an immoral relationship | अनैतिक संबंधाच्या रागातून युवकाचा खून

अनैतिक संबंधाच्या रागातून युवकाचा खून

ढेबेवाडीः पाटण तालुक्यातील मत्रेवाडी येथे शिवारात सापडलेल्या युवकाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पाटण न्यायालयाने त्यांना सात मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मत्रेवाडी (ता. पाटण) येथील शिवारात एका आंब्याच्या झाडाखाली सोमवारी सकाळी युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. अज्ञात ठिकाणी मृतदेह सापडल्याने हा घातपातच असल्याची चर्चा गावात दिवसभर चालू होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले.

त्यानंतर संबंधित महिलेच्या पती आणि दिरास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून युवकाचा खून केल्याचे उघडकीस आले. संबंधित युवक आणि महिला रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाखाली गप्पा मारताना पती आणि दिराच्या निदर्शनास आले. त्यामुळे रागात महिलेसह युवकालाही बेदम चोप देऊन युवकाचा गळा आवळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या घटनेत अविनाश शंकर कोळेकर (वय २२) या युवकाचा खून झाला असून, याप्रकरणी एका महिलेच्या पती व दिराला ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी त्यांना पाटण न्यायालयात हजर केले असता सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत.

Web Title: Murder of a youth out of anger over an immoral relationship