सिमेंटच्या कट्टयावर आपटून तरूणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 20:55 IST2020-11-18T20:53:45+5:302020-11-18T20:55:45+5:30
murder, sataranews ऐन भाऊबीजेच्या दिवशी सिमेंटच्या कट्टयावर आपटून २२ वर्षीय तरूणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना मुंजवडी, ता. फलटण येथे घडली. आशिष सुनील माने असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.

सिमेंटच्या कट्टयावर आपटून तरूणाचा खून
फलटण: ऐन भाऊबीजेच्या दिवशी सिमेंटच्या कट्टयावर आपटून २२ वर्षीय तरूणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना मुंजवडी, ता. फलटण येथे घडली. आशिष सुनील माने असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.
रोहीत दादा खोमणे (रा. मुंजवडी), आशाबाई उर्फ नकुसा अरुण आडके (रा. पाटस जि. पुण)े, दत्तू बबन सितकल (रा. मुंजवडी), सुनील अरुण आडके (रा. पाटस जि. पुणे), जया बाळू जाधव (रा. आसू ता. फलटण), अर्चना दादा खोमणे, (रा. मुंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी आशिष याची सासरवाडी गावातच आहे. पत्नी कामिनीला त्याने भाऊबीजेला मुंजवडी येथे तिच्या माहेरी सोडले होते. दुपारी ते पत्नीला घरी परत घेऊन आले तेव्हा कामिनीने आपली सासू सुनिता माने यांना सांगितले की, मुंजवडी गावातीलच अर्चना दादा खोमणे, तिचा मुलगा रोहीत दादा खोमणे व बहीण जया बाळू जाधव यांनी माझ्या माहेरी घरी येऊन आई सविता मधुकर येडे व मला माझ्या चारित्र्याचा संशय घेऊन मुलगा रोहीत याला सारखा फोन करते, असे म्हणत शिवीगाळ केली.
यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वरील संशयित हे मुंजवडीतील आशिष माने यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करु लागले. अर्चना खोमणे यांनी आपला मुलगा रोहीत याला तुझी सुन कामिनी ही सारखी फोन करुन बोलावते, असे सुनिता माने यांना म्हणत घरासमोर उभा असलेल्या त्यांचा मुलगा आशिष माने याला रोहीत खोमणे, दत्तु सितकल, सुनिल आडके यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सिमेंट कट्टयावर जोरात आपटले. त्यामुळे तो जागेवरच बेशुध्द पडला.
सुन कामिनी हिला लाथा-बुक्क्यांनी, दगड-विटांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास गेलेल्या आशिष याचा भाऊ संकेत यालाही सुनील आडके याने कुऱ्हाडीने डोक्यात मारले. यावेळी झालेला आरडाओरड व गोंधळ ऐकूण शेजारी पाजारी जमा झाल्यानंतर ते सर्वजण पळून गेले. बेशुध्दावस्थेतील आशिष याला फलटण येथे खासगी रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आशिष याची आई सुनीता सुनील माने (वय ४०, रा. मुंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे अधिक तपास करीत आहेत.