चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:50 IST2019-11-03T23:50:21+5:302019-11-03T23:50:25+5:30

उंडाळे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने दारूच्या नशेत कुºहाडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून केला. येवती (ता. कºहाड) येथे शनिवारी ...

Murder of a wife with a bone in the head | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

उंडाळे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने दारूच्या नशेत कुºहाडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून केला. येवती (ता. कºहाड) येथे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
रेखा विनोद कांबळे (वय ३५) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती विनोद रामचंद्र कांबळे (४२) हा अटकेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती येथे विनोद कांबळे हा पत्नी रेखासोबत वास्तव्यास होता. विनोदला दारूचे व्यसन होते. तसेच तो रेखावर चारित्र्यावरून संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. तो तिला मारहाणही करीत होता. शनिवारी रात्रीही विनोद दारूच्या नशेत घरी आला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने रेखाशी वाद घातला. हा वाद टोकाला गेल्यानंतर विनोदने घरात पडलेली कुºहाड घेऊन तिचा घाव रेखाच्या डोक्यात घातला. त्यामध्ये ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. आरडाओरडा ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी रेखाला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कºहाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आरोपी विनोद कांबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रविवारी तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Murder of a wife with a bone in the head