शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घृण खून, वाई तालुक्यात महिन्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 11:24 IST

गावात बंद पाळून निषेध

वाई : प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक रमेश जाधव (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वाई तालुक्यात एका महिन्यात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, परखंदी गावातील काही लोक शुक्रवारी सकाळी शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती तातडीने वाई पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे हा युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे समोर आले. खानापूर गावांत चौकशी केली असता गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खानापूरमधील रहिवासी असलेल्या रहीम नावाच्या एका युवकाने त्याला परखंदी परिसरात बोलावून नेल्याचे समजले. त्यानंतर त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी परखंदी परिसरात आढळून आल्याने गावात संतापाची लाट उसळली.अभिषेक हा मोलमजुरीचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई, लहान बहीण आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह गावात आणण्यात आला. तेव्हा आई व लहान बहिणीच्या हंबरड्याने परिसर गहिवरून गेला. एकुलता एक कमावता मुलगा गेल्याने जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, खानापूर गावाने त्वरित ग्रामसभेचे आयोजन करून गाव बंदचा निर्णय घेत दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींना गावात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत.गावात बंद पाळून निषेधखानापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावाने कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला आहे. वाई पोलिस ठाण्यात खुनाची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस