शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खटावमधील ‘तो’ खून अनैतिक संबंधातून!, बारा तासांत गुन्हा उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:43 IST

अंगणात झोपलेला असताना तरुणाच्या डोक्यात घातला दगड

पुसेगाव/खटाव : खटाव हद्दीतील आंबेडकरनगर येथे रोहित ऊर्फ विकास ऊर्फ विकी शांताराम सावंत (३०) याचा मंगळवारी (दि. २३) अंगणात झोपला असताना डोक्यात दगड घालून खून केला होता. याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुसेगाव पोलिसांनी बारा तासांतच तपास करून विकास दीपक कांबळे (२८, रा. खटाव) याला अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिलेली माहिती अशी की, रोहित ऊर्फ विकास ऊर्फ विकी सावंत हा मंगळवारी अंगणात झोपला असताना कोणीतरी डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद विकास सावंत याची आई सुमित्रा यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांच्या सूचनांनुसार पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली पथक तयार केले होते.गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना पथकास विकास सावंत याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या महिलेचे आंबेडकरनगर खटाव येथील आणखी एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचीही माहिती मिळाली. कौशल्यपूर्वक तपासाचा वापर करून विचारपूस केली असता संशयित विकास कांबळे याने महिलेशी विकासचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून विकासचा खून केल्याचे सांगितले.या कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर येवले यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस