शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून युवकाचा खून, खंडाळा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:41 IST

शिरवळ : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कु-हाडीने वर्मी घाव घालून एका युवकाचा खून करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील ...

शिरवळ : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कु-हाडीने वर्मी घाव घालून एका युवकाचा खून करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील भादे येथील दगडे वस्ती, होडी येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. उमेश पुरंदर काळे (वय २८, रा. दगडे वस्ती, होडी, भादे ता. खंडाळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर एका महिलेसह चौघे फरार झाले आहेत.याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भादे येथील दगडे वस्ती, होडी याठिकाणी उमेश काळे हा कुटुंबियांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, काल, रविवारी उमेश हा कुटुंबियांसमवेत घरासमोर बसला असताना त्याठिकाणी घरासमोर मैनेश मुकेश भोसले व इतर हे झाडाची कुऱ्हाडीने साल काढीत बसले होते. यावेळी उमेश काळे याने मैनेश भोसले याला माझ्या मोटारसायकलचा हप्ता थकीत असल्याचे सांगत उसणे घेतलेले पैसे मागितले. यावेळी या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली.दरम्यान, बाचाबाची सोडविण्यासाठी आलेल्या उमेशच्या पत्नीला मैनेश याने शिवीगाळ करत कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उमेशने हीच कुऱ्हाड मैनेशच्या डोक्यात मारली. यानंतर नीलेश भोसले, हेश भोसले व राजनंदिनी भोसले यांनी उमेश धरले. यावेळी मैनेश याने उमेशवर कुऱ्हाडीने वार करत मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर संशयित एका महिलेसह चौघे तेथून फरार झाले.जखमी उमेश याला प्राथमिक उपचाराकरिता तरडगाव, लोणंद येथील रुग्णालयात नेले असता त्याठिकाणी दाखल करुन घेतले नाही. यानंतर सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी उमेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून चारही आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.  घटनेची फिर्याद उमेश काळे याच्या पत्नीने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस