शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकाचा खून, सातारा जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:15 IST

कऱ्हाड : मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. जुळेवाडी, ता. कऱ्हाड येथे पुजारी चौकात ...

कऱ्हाड : मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. जुळेवाडी, ता. कऱ्हाड येथे पुजारी चौकात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजवर्धन महादेव पाटील (वय २४, रा. जुळेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.याप्रकरणी विजय बाबुराव काशिद (रा. जुळेवाडी) याच्यावर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडी येथील एका युवकाचा शनिवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त रात्री केक कापला जाणार होता. गावातील पुजारी चौकात त्यासाठी युवक जमले होते. राजवर्धन हासुद्धा त्याठिकाणी गेला.

राजवर्धनच्या घरापासून काही अंतरावरच हा चौक आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना गावातीलच विजय काशिद या युवकाने अचानक राजवर्धन याच्यावर धारदार कोयत्याने दहा ते पंधरा वार केले. मान, हात, पाय, पाठेवर वर्मी घाव बसल्यामुळे राजवर्धन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने युवकांची धावपळ उडाली. वार केल्यानंतर राजवर्धनला रक्तबंबाळ स्थितीत सोडून आरोपी विजय काशिद तेथून पसार झाला. तर राजवर्धन त्याही परिस्थितीत चालत घरापर्यंत गेला. कुटूंबिय व ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांच्यासह पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस पथकाला दिल्या. या घटनेने गावात तणावाचे वातावरण झाले. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.दरम्यान, रविवारी सायंकाळी आरोपी विजय काशिद याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याला रात्री उशिरा अटक केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस