शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:50 IST

मद्यपान करून कुटुंबाला सतत त्रास देत असल्याने वैतागलेल्या वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना गुणवरे (ता. फलटण) येथील नाळेमळा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुभाष लक्ष्मण नाळे (वय ३८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

ठळक मुद्देकुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खूनगुणवरेत झोपेत हल्ला : मद्यपान करून सतत द्यायचा त्रास

फलटण : मद्यपान करून कुटुंबाला सतत त्रास देत असल्याने वैतागलेल्या वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना गुणवरे (ता. फलटण) येथील नाळेमळा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुभाष लक्ष्मण नाळे (वय ३८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुभाष नाळे याला दारूचे व्यसन होते. तो घरातील लोकांना तसेच त्याच्या बहिणीला सतत त्रास देत होता. या त्रासाला घरातील कंटाळले होते. शुक्रवारी मध्यरात्री सुभाष नाळे हा घरातील दुसऱ्या खोलीत तो झोपला होता.

सुभाषला पत्नी, दोन मुले असा परिवार असून, ते शुक्रवारी परगावी गेले होते. त्यामुळे घरात सुभाष आणि त्याचे वडील असे दोघेच होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास लक्ष्मण बाळू नाळे (वय ६०) यांनी कुऱ्हाडीने वार करून सुभाष याचा खून केला.

या घटनेची फिर्याद शंकर बाळू नाळे (रा. गुणवरे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले तपास करीत आहेत. 

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस