शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

माणुसकीचा झरा खोलवर पोहोचविणारी ‘मम्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 20:25 IST

समाजकार्याची कार्यप्रेरणा आज तरी महाराष्ट्राला नवी नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक स्त्रिया स्वयंपूर्णतेने कार्यरत आहेत. समाजाला जागं करणारी शिकवण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वात पहिल्यांदा दिली. त्यातूनच प्रेरणा घेत मलटण, ता. फलटण येथील जिजाई सोशल संस्था चालवणाºया सुनीता सावंत यांनी

-विकास शिंदे, मलटण

समाजकार्याची कार्यप्रेरणा आज तरी महाराष्ट्राला नवी नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक स्त्रिया स्वयंपूर्णतेने कार्यरत आहेत. समाजाला जागं करणारी शिकवण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वात पहिल्यांदा दिली. त्यातूनच प्रेरणा घेत मलटण, ता. फलटण येथील जिजाई सोशल संस्था चालवणाºया सुनीता सावंत यांनी वंचितांना, उपेक्षितांना मायेनं जवळ घेऊन अनाथांची माय बनलेल्या आदर्शमाता सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांच्यासारखं काहीतरी करायचं असं ठरवलं. आदिवासी, अनाथ, वृद्ध यांच्या सेवेसाठी व प्रश्नांसाठी झटणाºया सुनीता मलटण व फलटण परिसरात ‘मम्मी’ म्हणून सर्वांना परिचित आहेत.

सुनीता मूळच्या बारामती तालुक्यातील निंबाळकर घराण्यातील लाटे या गावच्या. घरची प्रचंड गरिबी. मिळेल तेवढं शिक्षण त्यांनी घेतलं; पण त्यावर त्यांना थांबायचं नव्हतं. भावा-बहिणींना शिक्षण दिलं. शेतात काम केली. खूपच वाईटप्रसंगी त्यांनी उंबर व मकेची कणसं खाऊन पोट भरलं. पुढे लग्न होऊन संसार सुरू केला. देशसेवा करणारे रामदास सावंत यांनी सुनीताच्या आशा आकांक्षाला पंख दिले आणि सुनीताच्या समाजसेवेच्या व्रताला खंबीर साथ दिली. सुनीताला मुक्त विद्यापीठातून शिक्षण दिलं. लग्नाआधी अवघे आठवीपर्यंतचे शिक्षण घेणारी सुनीता आज ‘एमएसडब्ल्यू’ची पदवी घेऊन त्यांनी खºया अर्थाने समाजसेवेला सुरुवात केली.सुरुवातीला गल्लीतील महिला व मुलींना बरोबर घेऊन जिजाई सोशल संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुनीता व त्यांच्या टीमने राबवले. यामध्ये माणुसकीची भिंत हा त्यांचा उपक्रम अविरत सुरू आहे. यासाठी संस्थेच्या मलटण येथील कार्यालयाबाहेर एक कायमस्वरूपी कपाट ठेवलेले आहे.माणुसकीची भिंत हा उपक्रम पाहून फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते अप्पा बिडवे व सुहासकाका इतराज यांनी सुनीता यांना आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक मदत पोहोच करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मग जिजाई सोशल संस्थेचे सर्वच सदस्य कामाला लागले आणि फलटणकर नागरिकांना आवाहन करून शैक्षणिक साहित्य गोळा केले. फलटणकर नागरिकांनी भरभरून मदत करत एक गाडी वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य गोळा केले. यासाठी वडजल येथील पांडुरंग प्रसाद वृद्धाश्रम चालवणारे सुशांत जाधव यांनी विशेष मदत केली.सुनीता खºया अर्थाने ‘मम्मी’ बनत मलटण व परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांची मदत करतात. त्यांच्या एका हाकेवरून फलटणमधील अनेक दानशूर नागरिक पुस्तके आणून देतात. आज अशी पंचवीस मुले सुनीताच्या प्रयत्नातून शिक्षण घेत आहेत. सुनीता यांचा जिव्हाळा वडजल व कुरवली येथील वृद्धाश्रमात जास्त वाटतो. त्या म्हणतात, ‘या जुन्या जाणत्या माणसांना कसलीही मदत नको असते. त्यांना फक्त आपुलकीनं भेटणारं कोणीतरी हवं असतं. आपलं हक्काचं कोणीतरी असावं, असं या वृद्धांना वाटतं.’ सुनीता आठवड्यातून एक-दोन वेळा यांच्यासाठी वेळ देतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना गोष्टी सांगतात. त्यांच्या व्यथा जाणून घेतात. अनेकवेळा अशा वृद्धांना त्यांच्या घरी परत पाठविण्याचा प्रयत्न त्या करतात. सुनीता या खºया अर्थाने आधुनिक दुर्गा आहेत. त्या थकत नाहीत, सिंधुतार्इंची लेक होत त्या सर्वांच्या ‘मम्मी’ होतात आणि तितक्याच मायेनं अनाथ गरजू मुलांना प्रेम देतात. माणुसकीचा झरा खोलवर पोहोचवणाºया सुनीता या उपेक्षित वंचित मुलांची खºया अर्थाने ‘मम्मी’ होतायत.अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन मनाशी पक्कं ठरवलं, मुलांची लग्न झाली की संपूर्ण वेळ समाजासाठी द्यायचा. त्यातूनच जिजाई सोशल संस्थेची स्थापना झाली. अनाथ, आदिवासी वृद्ध लोकांसाठी आम्ही काम करतो, या कामात मिळणारा आनंद मन:शांती देणारा आहे.-सुनीता सावंत.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीSatara areaसातारा परिसर