राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई पोर्ट ट्रस्ट अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 01:34 IST2016-01-12T21:22:27+5:302016-01-13T01:34:37+5:30

विजयी संघास १,०१,१११ रुपये व भव्य चषक तर उपविजेत्या संघास रोख ५०,००० रुपये व चषक देण्यात आला.

Mumbai Port Trust Ajinkya in State Level Kabaddi Tournament | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई पोर्ट ट्रस्ट अजिंक्य

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई पोर्ट ट्रस्ट अजिंक्य

पाचगणी : पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिंद्रा मुंबई यांच्यात अटीतटीचा चुरशीचा सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात मुंबई पोर्टच्या मुबीद शेख याने आणि महिंद्राच्या आनंदा पाटील यांनी आक्रमक चढाया करून प्रेक्षकांची मने जिंकली.शेवटच्या चढाईत मुंबई पोर्टच्या प्रमोद घुलेने गडी बाद करत आपल्या संघाला केवळ एका गुणाने विजय मिळवून दिला व विजेतेपद पटकावले. महिंद्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते. तर बी.ई.जी ला तृतीय क्रमांक मिळाला.विजयी संघास १,०१,१११ रुपये व भव्य चषक तर उपविजेत्या संघास रोख ५०,००० रुपये व चषक देण्यात आला. तर तृतीय क्रमांकास २५,००० व चषक देण्यात आला. या स्पर्धेचा बक्षीसवितरण समारंभ आमदार मकरंद पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, महाबळेशवर माजी नगराध्यक्ष पी. डी. पार्टे, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक व पंचायत समिती सदस्य राजेंद्रशेठ राजपुरे, महाबळेश्वर उपसभापती संजय गायकवाड, आरिफभाई शेख, दत्ता वाडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार
पडला.
यावेळी आ. मकरंद पाटील म्हणाले, ‘व्यायाम मंडळाने कबड्डी स्पर्धेचे व्यापकपणे केलेले आयोजन उत्कृष्ट असून, या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना आपल्या क्रीडागुणांना वाव मिळत आहे. तर राज्य पातळीवरील संघाचा खेळ पाहून त्यातून आणखी शिकण्यास मदत होत आहे. या मंडळाने अमृतमहोत्सव साजरा करून पाचगणीतील कबड्डीच्या वलयाला आणखी झळाळी दिली आहे. पाचगणीची ही परंपरा पुढेही कायम राहावी. कबड्डी स्पर्धांना आपले सहकार्य असतेच; परंतु इतरही स्पर्धा मंडळाने भरवल्यास आपले सर्वतोपरी सहकार्य राहील.’
राज्यस्तरीय महिलांचा अंतिम सामनाही रोमहर्षक झाला. यामध्ये शिवशक्ती मुंबई आणि महात्मा गांधी मुंबई यांच्यातील झालेला सामना शिवशक्तीने एक गुणाने जिंकला.
तर महात्मा गांधी मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजमाता पुणे संघाला तृतीय तर वाघेश्वर पुणेला चतुर्थ
क्रमांकाचे बक्षीस मिळाले. स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai Port Trust Ajinkya in State Level Kabaddi Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.