सासवड-टाकोबाईचीवाडी बंधाऱ्याला मुहूर्त

By Admin | Updated: January 5, 2015 00:36 IST2015-01-04T21:26:09+5:302015-01-05T00:36:13+5:30

ग्रामस्थांमध्ये समाधान : पाच लाखांचा निधी मंजूर; काम सुरू

Muhurat to Saswad-Takobaiichiwari dam | सासवड-टाकोबाईचीवाडी बंधाऱ्याला मुहूर्त

सासवड-टाकोबाईचीवाडी बंधाऱ्याला मुहूर्त

आदर्की : सासवड-टाकोबाईचीवाडी, ओढ्यावर पाच वर्षांपूर्वी सिमेंट बंधारा बांधला; परंतु पाणीसाठा होत नव्हता. त्यासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच बंधारा दुरुस्तीचे काम सुरू केल्याने ग्रामस्थांमधून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.
फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात लाखो रुपये खर्च होतात; परंतु स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे कामे निकृष्ट दर्जाची होतात. त्यामुळे लाखो रुपये पाण्यात जातात. असाच प्रकार सासवड-टाकोबाईचीवाडी ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधला; परंतु पावसाळ्यात व उन्हाळ्यात धोम-बलकवडीचे पाणी सोडूनही पाच दिवसांत बंधारा कोरडा ठणठणीत पडत होता. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये छायाचित्र व बातमी प्रसिद्ध होताच संबंधित सिमेंट बंधारा दुरुस्तीसाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध होऊन काम सुरू झाल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांमधून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Muhurat to Saswad-Takobaiichiwari dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.