सातारा: खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी 'फाईट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लावलेल्या बॅनर आणि गाडीची तोडफोड केली. चित्रपटातील 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या डायलॉगला उदयनराजे समर्थकांनी आक्षेप घेतला. राधिका पॅलेस हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
'फाईट'वरुन वातावरण 'टाईट'; उदयनराजे समर्थकांकडून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:59 IST