शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला गेले; अखेर 'नेमके' कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 16:50 IST

अजितदादा - उदयनराजे भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात खळबळ

सातारा : भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विश्रामगृहात बैठक झाली.  या भेटीनंतर उदयनराजेंनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. अन् त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र या भेटीचे कारण अखेर समोर आले आहे.विकासकामांबाबत तसेच नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावाद्वारे मागणी केली. अजितदादा - उदयनराजे भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.सातारा नगरपरिषद ही 'अ' वर्ग नगरपरिषद असून नुकतीच सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे २१.०४ चौ.कि.मी. इतके क्षेत्र वाढ होऊन एकुण २९.१९ चौ.कि.मी. इतके झाले आहे. हद्दवाढ झालेल्या क्षेत्राचे संपुर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून या भागातील आवश्यक त्या रस्ते, गटारी, पथदिवे व ओपन स्पेस विकसीत करणे इ. प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यसाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रके नगरपरिषदेने केली आहेत. त्याची एकुण किंमत रु.४,८५० लक्ष इतकी आहे.सदरचा भाग हा मूळ हद्दीपेक्षा जवळपास तिप्पट एवढा असून त्या भागातील सुमारे ६०३७३ इतक्या लोकसंख्येस पायाभूत सुविधा पुरविणे आर्थिकदृष्ट्या नगरपरिषदेस शक्य नाही, त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयी सुविधा पुरविणेसाठी शासनाच्या विभागाकडुन अनुदान प्राप्त होते, त्या अंतर्गत सातारा नगरपरिषदेस रू.४,८५० लक्ष इतका निधी मंजुर करावा ही मागणी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAjit Pawarअजित पवार