शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकात होणार?, अनेकांचे धाबे दणाणले

By नितीन काळेल | Updated: May 29, 2025 18:36 IST

कर्मचारी बदली प्रक्रिया पारदर्शकपणाची प्रशासनाकडून माहिती 

नितीन काळेल सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत क आणि ड संवर्गात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसारच झालेली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली. दरम्यान,, जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्याबदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घटस्फोटीतांची नोंद सेवा पुस्तकात करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.जिल्हा परिषदे अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात संवर्ग क आणि डमधील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया पार पाडली जाते. यावर्षीही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही बदली झाली. प्रशासकीय, आपसी आणि विनंती अशा या बदल्या झालेल्या आहेत. तरीही या बदल्यावरुन आरोप सुरू झालेले आहेत. समााजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तर २ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी पत्रकार परिषदेत बदलीविषयी माहिती दिली.अर्चना वाघमळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील आताची कर्मचारी बदली प्रक्रिया ही सामान्यीकरण तत्वानुसार आणि पारदर्शकपणे झाली आहे. या बदली प्रक्रियेचे रेकाॅर्डिंग आहे. बदलीत अन्याय झाल्याबाबत एकही निवेदन तसेच तक्रार आलेली नाही. एखाद्याची बदली मनाप्रमाणे झाली नसेल तर चुकीचे प्रकार चर्चेस आणले जातात. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनाही या बदलीबाबत माहिती देणार आहोत. त्यांना बदलचीची सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. कोणाची बदलीबाबत तक्रार असेल त्यांनी समितीकडे अर्ज किंवा तक्रार द्यावी. त्याचे निराकारण करण्यात येईल.दरम्यान, प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रियाही लवकरच होणार आहे. या बदलीबाबत चुकीचे प्रमाणपत्र घेणाऱ्यांची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकावर करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. यामुळे अनेकांना पुढील अडचणींना सामोरे जावू लागू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदली