स्वस्त धान्य दुकानदारांचे आज आंदोलन
By Admin | Updated: February 10, 2015 00:26 IST2015-02-09T21:09:21+5:302015-02-10T00:26:35+5:30
कऱ्हाड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे रेशनकार्डावरील धान्य मिळावे, रॉकेल कोटा प्रती माणसी दोन लिटरप्रमाणे मिळावे, शुभ्र कार्डधारकांना रॉकेल देण्यात यावे

स्वस्त धान्य दुकानदारांचे आज आंदोलन
कऱ्हाड : जानेवारीचा रॉकेल कोटा नियमित कोट्यापेक्षा ४० टक्के कमी दिल्याने शासनाचा हा कुटील डाव उधळून लावण्यासाठी कऱ्हाड तालुका स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ रॉकेल विक्रेता संघटनेतर्फे मंगळवार, दि. १० रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीसमोर रेव्हिन्यू क्लब येथे आंदोलन करणार असल्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली. कऱ्हाड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे रेशनकार्डावरील धान्य मिळावे, रॉकेल कोटा प्रती माणसी दोन लिटरप्रमाणे मिळावे, शुभ्र कार्डधारकांना रॉकेल देण्यात यावे, अनुदान न देता धान्य द्यावे, रॉकेल दुकानामध्ये बायोमेट्रिक पद्धत शासनाने बंद करावी, केंद्र शासनाने केलेली रॉकेलची रोख सबसीडी तत्काळ रद्द करावी, रेशन कार्डावरील सर्व जीवनावश्यक वस्तू लाभर्थ्यांना देण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेने मागणीनुसार बी. पी. एल. व अंत्योदय कार्डावर रोख सबसिडी न देता धान्य देण्यात यावे व सार्वजनिक विवरण व्यवस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तूंचे योग्य काळात फेरबदल कोणतेकेले आहेत? याबाबत जनतेला माहिती देण्यात यावी, अशी मागणी संघटनेद्वारे करण्यात आली आहे. या स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेता संघटनेतर्फे काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चास ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते यांच्याबरोबर सामान्य नागरिकांनीही उपस्थिती लावून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष के. एम. पवार व खजिनदार सुरेश पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)