शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Satara: वाझोली-डाकेवाडी रस्त्यावर डोंगराच्या दरडी कोसळल्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 14:10 IST

डोंगरावरील दगड गावावर कोसळण्याची शक्यता

सणबूर : पाटण तालुक्यातील काळगाव खोऱ्यातील अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या वाझोली-डाकेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर जोराच्या पावसामुळे रस्त्यावर सतत दरडी कोसळत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे दरडीबरोबरच पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगरातून मोठे दगडही वाहून रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.वाझोली गावाजवळच्या डोंगरावर मोठमोठे दगड आहेत. डोंगरावरील हे दगड कधीही गावावर कोसळतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. विभागाला दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढले होते. कमी वेळामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले आणि ओढ्याच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.

अनेक दुर्गम डोंगराळ गावांना जोडणाऱ्या वाझोली, डाकेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर कुमकवत झालेल्या दरडी पावसामुळे कोसळत आहेत. डोंगराचा भाग गावाच्या खाली असल्याने डोंगरातून पाण्याच्या प्रवाहामुळे दरडीबरोबरच इतर दगडही रस्त्यावर येत आहेत. वाझोली गावातून निवी, कसणी, निगडे, घोटील अशा अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांना हा रस्ता उपयुक्त आहे.तहसीलदारांनी तातडीने दिल्या सूचना वाझोली गावाजवळच्या डोंगरावरील भलेमोठे दगड लोकवस्तीत कोसळण्याच्या भीतीने येथील ग्रामस्थांची झोप उडवलेली आहे. दरड कोसळल्याच्या प्रकाराने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस पाटील विजय सुतार यांनी तहसीलदार अनंत गुरव यांनी या घटनेची माहिती दिली. तहसीलदारांनी तातडीने बांधकाम विभागाला पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यावेळी तलाठी डी. जे. कोडापे यांनी वाझोली गावच्या डोंगरावर जाऊन पाहणी करून याची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप यावर काहीच उपाययोजना झालेली नाही. मुसळधार पावसामुळे मोठ्या दगडाच्या शेजारील दगड रस्त्यावर आलेले आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनाही याबाबत माहिती दिली आहे. - आनंदा मोरे, माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, वाझोली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन