शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, लोणंद एमआयडीसीनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 1:34 PM

धडक देऊन ही भरधाव अज्ञात कार शिरवळकडे निघून गेली.

लोणंद : लोणंद एमआयडीसी रोडवर गोळेगाव फाट्यानजीक भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यशवंत कोकीळ असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आज, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणंद-शिरवळ रस्त्यावर गोळेगाव फाट्याजवळ वाघोशी येथे राहणारे यशवंत भिकू कोकीळ हे वाघोशीहून लोणंदकडे मोटार सायकाल (एमएच ११ बीएम ३२१५) लुनावरून येत होते. गोळेगाव फाट्याजवळ आले असता लोणंदहून शिरवळकडे निघालेल्या भरधाव कारने त्याच्या मोटार सायकलला समोरून जोरदार धडक दिली.धडक देऊन ही भरधाव अज्ञात कार शिरवळकडे निघून गेली. जोरदार धडकेत यशवंत कोकीळ (वय ८०, रा. वाघोशी) हे जागीच ठार झाले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. लोणंद पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात