मुलाचा वाद सोडवताना आईलाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:37 IST2021-04-11T04:37:37+5:302021-04-11T04:37:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क साताराः शहरातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका युवकास मारहाण सुरू असताना सोडवण्यास गेलेल्या आईला मारहाण करुन शिवीगाळ ...

The mother was also beaten while resolving the child's dispute | मुलाचा वाद सोडवताना आईलाही मारहाण

मुलाचा वाद सोडवताना आईलाही मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

साताराः शहरातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका युवकास मारहाण सुरू असताना सोडवण्यास गेलेल्या आईला मारहाण करुन शिवीगाळ करत दोघांनाही लोखंडी पाते आणि विळ्याच्या लाकडी मुठीने मारून जखमी केले. याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शैलश काशिनाथ पवार असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना गुरुवार, ८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेम संतोष साळुंखे (वय १९, रा. गुरुवार पेठ, सातारा) हा युवक त्याच्या घरासमोर बसला असता शैलश काशिनाथ पवार (रा. गुरुवार पेठे, शेटे चौक, सातारा) याने प्रेम याला लाथ मारली. याची विचारणा केली असता त्याने चिडून जावून शिवीगाळ केली. यातच दोघांची भांडणे सुरू झाली. यावेळी प्रेम याची आई शीला या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान, शीला यांना मारहाण सुरू असताना प्रेम सोडविण्यासाठी गेले असता त्याला शैलेश याने लोखंडी पाते आणि विळ्याची मूठ त्याच्या कपाळावर मारली. यात प्रेम जखमी झाला. या घटनेत प्रेमच्या दोन्ही गुडघ्यांना आणि डोळ्याला तसेच कपाळाला जखमा झाल्या आहेत. आई शीला यांच्याही दोन्ही गुडघ्यांना जखम झाली आहे. अधिक तपास सहायक फौजदार ए. आर. जगदाळे हे करत आहेत.

Web Title: The mother was also beaten while resolving the child's dispute