शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आईच्या आजारपणाला कंटाळून गळा आवळून खून, मुलाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:45 IST

वडूज : पडळ, ता. खटाव येथील शांताबाई नारायण वाघमारे (वय ९० ) यांच्या डोक्यात विटाने मारहाण करून व दोरीने ...

वडूज : पडळ, ता. खटाव येथील शांताबाई नारायण वाघमारे (वय ९० ) यांच्या डोक्यात विटाने मारहाण करून व दोरीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. हा खून त्यांचा मुलगा अंकुश नारायण वाघमारे ( वय ४५) याने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असनू, वडूज पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पडळ, ता. खटाव येथील शांताबाई वाघमारे यांना अर्धांगवायूचा आजार होता. त्यांची सतत सेवा करायला लागत होती. तसेच दवाखान्याचा खर्चही वाढत होता. त्यामुळे त्यांचा मुलगा अंकुश वाघमारे याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात विटाने मारहाण करून तसेच दोरीने गळा आवळून आईचा खून केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत या खुनाचा छडा लावला. त्यांच्या मुलानेच हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. जन्मदात्या आईचा खून मुलानेच केल्याने वडूज परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस