शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने प्रेमविवाह केला..आईने जीवन संपवले; सातारा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:26 IST

उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

सातारा : एका २३ वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने गावातील एका तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. या नैराश्यातून मुलीच्या आईने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील एका गावात मंगळवारी सकाळी घडल्याचे समाेर आले.सातारा तालुक्यातील एकाच गावामध्ये राहणाऱ्या तरुण, तरुणीचे एकमेकांवर अनेक वर्षांपासून प्रेम होते. मात्र, घरातील लोकांचा लग्नाला विरोध होईल या भीतीने दोघांनी रविवार, दि. २२ राेजी घरातून पलायन केले. त्यानंतर, एका ठिकाणी जाऊन त्यांनी रजिस्टर लग्न केले. या प्रकारानंतर मुलीच्या आई-वडिलांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात येऊन मुलगी पळून गेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तातडीने दोघांचाही शोध घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्यांनी रजिस्टर लग्न केले असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबातील लाेकांना पोलिस ठाण्यात बोलावले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्या इच्छेने त्यांनी लग्न केले आहे. त्यामुळे दोघांना सुखात संसार करू द्या, आडकाठी करू नका, असा सल्ला पोलिसांनी दोन्ही कुटुंब प्रमुखांना दिला.

मुलीला पाहण्यासाठीही आई गेली नाही..मुलगी घरातून पळून गेल्याने तिच्या आईने मनाला फार लावून घेतले होते. दोन दिवसांतच मुलगी परत पोलिस ठाण्यात आली. मात्र, येताना दोघे लग्न करून आले हे जेव्हा मुलीच्या आईला समजले, तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसला. मुलीला पाहण्यासाठीही आई पोलिस ठाण्यात आली नाही. घरातले लोक पोलिस ठाण्यातून घरी जाईपर्यंत मुलीच्या आईने नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले होते. तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी मुलीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.