शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार 

By नितीन काळेल | Updated: May 23, 2025 17:00 IST

शेत जमीनही वाहून गेली, ६ जनावरे, १५० कोंबड्यांचा मृत्यू अन् ४० घरांची पडझड 

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून २४ तासांत तब्बल २४ महसुल मंडलात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर पावसामुळे आतापर्यंत मोठ्या ६ जनावरांचा आणि १५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० घरांचेही नुकसान झालेले आहे. कऱ्हाड तालुक्यात शेतात खत टाकण्यासाठी गेल्यावर तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसल्याने वृध्द शेतकरी ठार झाला. तसेच पेरले येथे शेत जमीन वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे.सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. सोमवारपासून तर पावसाची उसंतच नाही. रात्रं-दिवस पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे नुकसानीच्याही घटना घडू लागल्या आहेत. वळवाच्या पावसामुळे वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी १ तर माण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी २ असे मिळून एकूण ६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर खटाव तालुक्यातच १५० कोंबड्याचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

सततच्या पावसात घरांचीही पडझड सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० घरांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. सातारा आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी १२ घरांचे तर कोरेगावला ६, वाई तालुक्यात ४, पाटण ३, माणमध्ये २ आणि खंडाळा तालुक्यात एका घराची पडझड झालेली आहे.

पेरलेतील शेतकऱ्याचा मृत्यू; वडोलीत जमीन वाहून गेली..कऱ्हाड तालुक्यातील पेरले येथील संभाजी सूर्यवंशी (वय ७०) हे गुरूवारी सायंकाळी शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे पावसामुळे अर्धा एेकर शेत जमीन वाहून गेली. त्यामुळे हळद पिकाचे नुकसान झाले आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस..२४ तासांत जिल्ह्यातील तब्बल २४ मंडलात अतिवृष्टी झाली. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. सातारा तालुक्यातील सातारा मंडलात ७६.८ मिलिमीटरची नोंद झाली. तर वर्ये ९३, कण्हेर ७७, अंबवडे ८९, दहिवड ७७, परळी मंडलात ८९ मिलिमीटर पाऊस झाला. जावळी तालुक्यात मेढा १०३, आनेवाडी ११०, कुडाळ ९८, बामणोली १२८, केळघर आणि करहर मंडलात १०३ मिलिमीटर पाऊस पडला.

कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन ६६.५ आणि किन्हई मंडलात ८८.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वाई तालुक्यातील पसरणी मंडलात १०३, भुईंज आणि पाचवड ८४, धोम आणि वाई मंडल ७२ तर ओझर्डेत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा मंडलात सर्वाधिक १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वर आणि पाचगणी मंडल १०३ आणि लामजला ७९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKaradकराडFarmerशेतकरीDeathमृत्यू