प्रकृती ढासळल्यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुंबईला हलविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 11:16 IST2020-02-19T11:16:06+5:302020-02-19T11:16:21+5:30
भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रात्री उशिरा प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रकृती ढासळल्यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुंबईला हलविले
सातारा - भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रात्री उशिरा प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तदाब वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले रात्री आपल्या सुरुची या निवासस्थानी होते. रक्तदाब वाढल्याने त्यांना लगेचच येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे नेण्यात आले आहे.