शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: पक्ष दुभंगले तरी मने नाही दुभंगली; शशिकांत शिंदे, रामराजेंची विधान परिषदेत एकत्र एन्ट्री

By दीपक देशमुख | Updated: March 5, 2025 16:15 IST

सातारा : पक्ष दुभंगले तरी सातारा जिल्ह्यातील नेत्यांची मने दुभंगलेली नसल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनाला दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ...

सातारा : पक्ष दुभंगले तरी सातारा जिल्ह्यातील नेत्यांची मने दुभंगलेली नसल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनाला दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे आणि अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर या दोघांचीही विधान परिषदेत एकत्रच एन्ट्री झाली. दोघांचेही एकत्रित फोटो व्हायरल झाल्यामुळे आता खुमासदार चर्चा साताऱ्यात रंगली आहे.विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सर्वच पक्षांचे मंत्रीमहोदय आणि आमदार येथे येत आहेत. तथापि, मंगळवारी रामराजे आणि शशिकांत शिंदे हे विधान परिषदेत एकाच कारमधून विधान परिषदेच्या आवारात आले. गाडीतून उतरून दोघेही विधान परिषदेत एकत्रच चालत गेले. यामुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले.राष्ट्रवादी काँग्रेस २०२३ पर्यंत एकसंध आणि बळकट होती आणि पक्षात रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे खंदे शिलेदार होते. परंतु, पक्षात फूट पडल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर अजित पवार यांच्यासोबत गेले. शशिकांत शिंदे यांनी मात्र खा. शरद पवार यांची साथ सोडली नाही. पक्ष दुभंगल्याने हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात गेले तरी मनाने मात्र या दोन्ही नेत्यांची दोस्ती कायम असल्याचे पुन:पुन्हा अधोरेखित होत आहे.सातारा जिल्ह्यातील फलटणचा पाणीप्रश्न सध्या पेटला आहे. जिहे-कठापूरचे पाणी माण-खटावला जात असल्यामुळे कोरेगावकरांतूनही विरोध होत आहे. जिल्ह्यातील या पाणीप्रश्नावर हे दोन्ही विधान परिषदेत आवाज उठवतील, अशी अपेक्षा व्यक्त आहे.

अधिवेशनादरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी करत घोषणा दिल्या. अबू आझमी, कोरटकर, सोलापूरकर आदी लोकं चुकीची वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष तसेच मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? याप्रकरणी कारवाई केली नाही तर महाविकास आघाडीचे सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला.रामराजे यांची अदृश्य शक्तीराजकारणातील चाणक्य रामराजे नाईक-निंबाळकर कोणत्याही पक्षात असले तरी त्यांची अदृश्य शक्ती नेमकी कोठे असते, याचा कोणाला मागमूस लागत नाही. रामराजे यांनी अजित पवार यांच्या पक्षात असले तरी जो आपले काम करणार तो आपला पक्ष, अशीही भूमिका ते कधी जाहीर करतात. त्यामुळे ते शिंदे यांच्यासोबत सहजच गेले तरी चर्चा तरी होणारच.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरShashikant Shindeशशिकांत शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस