शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मिशन लसीकरण; कऱ्हाड १ लाख ३६ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

कऱ्हाड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणालाही वेग आला आहे. कऱ्हाड तालुक्यात आरोग्य विभागाने त्यासाठी अचूक नियोजन केले ...

कऱ्हाड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणालाही वेग आला आहे. कऱ्हाड तालुक्यात आरोग्य विभागाने त्यासाठी अचूक नियोजन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह शहरातील नागरी आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात टप्प्याटप्प्याने लसीकरण होत असून, आजअखेर १ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या २३ हजारांवर आहे. त्यातच संक्रमणाचा वेग वाढत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. संक्रमण रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तातडीने त्यांना ‘क्वारंटाइन’ करण्यात येत आहे. तीव्र लक्षणे असणाऱ्या बाधितांना रुग्णालयात तर सामान्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाशी लढा सुरू असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणानेही तालुक्यात वेग घेतला आहे.

सध्या सरसकट नागरिकांना लसीकरण करण्यात येत असून यापूर्वी साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबरच आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली आहे.

- चौकट

आरोग्य केंद्रनिहाय लसीचे नियोजन

कऱ्हाडातील उपजिल्हा रुग्णालय, उंडाळेतील ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रामधून नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. तालुक्यातील १ लाख २७ हजार ३२७ जणांना ‘कोविशिल्ड’ तर ९ हजार ३२० जणांना ‘कोव्हॅक्सिन’ असे एकूण १ लाख ३६ हजार ६४७ जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

- चौकट

लोकसंख्या : ५,८७,४११

लसीकरण : १,३६,६४७

- चौकट

झालेले लसीकरण : २३.२६ टक्के

लसीच्या प्रतीक्षेत : ७६.७४ टक्के

- चौकट

आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण

हेळगाव : ४५८५

इंदोली : ६७५१

काले : १०७०७

कोळे : ६७५१

मसूर : ६८०८

रेठरे : ६०९०

सदाशिवगड : ७०२८

सुपने : ६२३५

उंब्रज : ८९९६

वडगाव : ६७५८

येवती : ५२२०

(उपकेंद्रांसह एकूण)

- चौकट

लसीकरणाचा लेखाजोखा

नागरी केंद्र, कऱ्हाड : ७७७१

ग्रामीण रुग्णालय, उंडाळे : ४००१

उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड : २१११५

सह्याद्री : ७९३४

गुजर : १९२५

कृष्णा : ८५२६

कऱ्हाड हॉ. : ११८५

शारदा : ४४४९

श्री : ११६५

कोळेकर : १५१७

सीटी हॉ. : ३९८

सिद्धिविनायक : ७२२

- चौकट

एकूण लसीकरण - १३६६४७

शासकीय रुग्णालय : १०८८२६

खासगी रुग्णालय : २७८२१

- चौकट

लाभार्थी : पहिला डोस : दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी : ९७३८ : ५४६२

फ्रंटलाईन वर्कर : ७८७२ : ३१७१

१८ ते ४४ वर्षे : ६४९८ : ५०७

४५ ते ६० वर्षे : ४७०९४ : ५१७१

६० वर्षांवरील : ४३५५६ : ७५७८

एकूण लसीकरण : ११४७५८ : २१८८९

(आरोग्य विभागाच्या १३ जूनच्या अहवालानुसार)