शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सहाव्या महिन्यात गर्भपाताची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फारदिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या महिन्यात गर्भपात करून घेण्याची अनुमती गुरुवारी दिली.वाई तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फारदिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या महिन्यात गर्भपात करून घेण्याची अनुमती गुरुवारी दिली.वाई तालुक्यातील वावधन गावात नवीन वसाहतीत साई मंदिराजवळ राहणाºया या गर्भवतीने केलेल्या रिट याचिकेवर न्यायालयाने पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रदीप सांबरे व बाल हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. नित्यांनंद ठाकूर यांनी याचिकार्ती ची तपासणी करून अहवाल द्यावा, असा आदेश ४ आॅगस्ट रोजी दिला होता.त्यानुसार डॉ. सांबरे व डॉ. ठाकूर यांच्याखेरीज बी.जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अंजय चंदनवाले, बालरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. आरती किणीकर व रेडिओलॉजी विभागाच्या प्राध्यापक डॉ. शेफाली पवार यांचा समावेश असलेल्या मेडिकल बोर्डाने ७ आॅगस्ट रोजी या महिलेची तपासणी करून न्यायालयास अहवाल दिला. त्यात त्यांनी या महिलेच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाच्या हृदयात कोणते गंभीर स्वरूपाचे दोष आहेत याचा तपशील दिला. असे मूल जन्माला आले तरी जन्मानंतर लगेच त्याच्या हृदयावर अनेक जोखमीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील व त्यात मूल दगावण्याचाही धोका आहे. शिवाय असे मूल काही काळ जगले तरी रक्तास पुरेशा आॅक्सिजन पुरवठ्याअभावी त्याचे आयुष्य अत्यंत खडतर असेल व ते तारुण्यावस्थेपर्यंत जगणे अशक्य वाटते, असे मतही या डॉक्टरांनी अहवालात नमूद केले.न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मेडिकल बोर्डाच्या या अहवालाखेरीज बंगळुरु येथील ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. देवी शेट्टी यांनी व्यक्त केलेले तशाच स्वरूपाचे मतही विचारात घेतले. जन्माला येणाºया मुलामध्ये गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येऊ शकेल असे दोष असल्याचे मत दोनहून अधिक डॉक्टरांनी दिले तर गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२) (बी) नुसार पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भपात केला जाऊ शकतो. मात्र या महिलेच्या गर्भातील दोषाचे गांभीर्य पाहता जन्माला येणारे मूल जगण्याची शक्यता फारस कमी दिसत असल्याने गर्भारपण पाचव्या महिन्याच्या पुढे गेलेले असले तरी या महिलेच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी तिला गर्भपात करू देणे न्यायाचे होईल, असे खंडपीठाने म्हटले. शिवाय भारत सरकारच्या वतीनेही अशा गर्भपातास कोणत्याही कायद्याच्या किंवा वैद्यकीय मुद्दयावर विरोध केला नाही, याचीही न्यायालयाने नोंद घेतली.जेथे या महिलेची वैद्यकीय तपासणी झाली तेथेच तिचा गर्भपात केला जावा, न्यायालयास अहवाल देणाºया बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मेडिकल बोर्डाच्या डॉक्टरांनी त्यावर देखरेख करून गर्भपात प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवावे, असे निर्देशही न्यायालायने दिले.