म्हसवड : माण तालुक्यातील पळशी येथे एका १३ वर्षीय मुलाला ५० रुपये चोरल्याच्या संशयावरून लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हाताला आणि नाकाला फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात रोहित सुभाष लोखंडे (रा. पळशी, ता. माण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित मुलाचे वडील हे कामासाठी कराड येथे गेले होते. ८ मार्च रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास त्यांचा मुलगा मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना, संशयित रोहित लोखंडे याने त्याला बोलावून घेतले आणि ‘दुकानाच्या गल्ल्यातून ५० रुपये घेऊन ये’ असे सांगितले. त्यावर मुलगा गल्ल्यातून पैसे काढत असताना, रोहितने आपल्या मोबाइलमध्ये त्याचे शूटिंग केले. त्यानंतर ‘तू आमच्या दुकानातून पैसे चोरत आहेस’ असा आरोप करून, त्याला दुकानातून ओढत बाहेर काढले. तिथे त्याला लाकडी काठीने दोन्ही पायांच्या नडगीवर, पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण केली.दरम्यान, मारहाणीमुळे मुलगा बेशुद्ध पडला होता. घटनेची माहिती मिळताच वडिलांनी त्याला तातडीने म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि नाकावर फॅक्चर झाल्याचे सांगितले.मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी ११ मार्च २०२६ रोजी म्हसवड पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित रोहित लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत.
Web Summary : A 13-year-old boy in Palashi, Satara, was severely beaten with a stick for allegedly stealing ₹50. He suffered fractures and was hospitalized. Police have registered a case against Rohit Lokhande. Investigation is underway.
Web Summary : सतारा के पलशी में 13 वर्षीय लड़के को 50 रुपये चोरी करने के संदेह में बेरहमी से पीटा गया। उसे फ्रैक्चर हुए और अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस ने रोहित लोखंडे के खिलाफ मामला दर्ज किया। जांच चल रही है।